Breaking

Nagpur Police नोकरी लागल्यावर लग्नाला नकार, प्रेयसीची आत्महत्या

Young engineer committed suicide : इंजिनियर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

Nagpur दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. लग्नासाठी कुटुंबियांना विचारण्याचा निर्णय घेतला. पण प्रियकराला वाटले नोकरी लागली तर दोघांचेही पालक लगेच होकार देतील. दोघेही इंजिनियर. दोघांनाही नोकऱ्या लागल्या. आता तर आपण नोकरीत सेटल झालोय, आता लग्न करायला हरकत नाही, असं प्रेयसी वारंवार म्हणू लागली. तो टाळायला लागला. त्याने टाळण्याचीही मर्यादा ओलांडली. मग तिने टोकाचं पाऊल उचललं. एका रात्री गळफास घेऊन जीवनयात्राच संपवली. एका सुशिक्षित तरुणीने प्रेमप्रकरणात टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना वर्गमैत्रिणीसह प्रेमसंबंध प्रस्थापित केले. दोघांनीही कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रियकराने वेळेवर लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पीयूषा वेळकर (२६, नवीन कामठी) असे मृत युवतीचे नाव आहे. तर सागर राजू करडे (३०, कन्हान) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

Beed Case वाल्मिक कराडवर अखेर मकोका; एसआयटीने घेतलं ताब्यात

पीयूषा आणि सागर दोघेही नोकरी करीत असल्यामुळे आता लग्नाला कुणी विरोध करणार नाही, अशी धारणा ठेवून सागरकडे लग्नाचा तगदा लावत होती. मात्र, सागर वेगवेगळी कारणे देऊन लग्नास टाळाटाळ करीत होता. प्रियकराची लग्नास टाळाटाळ बघता पीयूषा नैराश्यात गेली. तिने नोकरी सोडून दिली आणि घरी राहायला लागली. यादरम्यान, तिला अनेकदा चांगली स्थळे आली. परंतु, तिने नकार देऊन सागरची वाट बघण्याचे ठरविले.

ACB arrest : जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली एक हजार रुपयांची लाच !

जगण्याची इच्छा नाही
एक दिवस सागरने तिला चांगला मुलगा बघून लग्न करण्याच सल्ला दिला. कुटुंबियांनी लग्नाला नकार दिल्याचा बहाणा सागरने केला. पीयूषा आणखी नैराश्यात गेली. तिने ‌वडिलांकडे सागरबाबत सांगितले. त्याच्या आईवडिलांना लग्नाबाबत विनंती करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, सागरने लग्न करण्यास नकार दिला. संबंध संपल्याचे सांगितले. त्यामुळे पीयूषाने आत्महत्या केली. पण प्रेमात दगा झाल्यामुळे जगण्याची इच्छा नसल्याचे तिने आईकडे बोलून दाखवले होते.