Breaking

Nathuram Godse Hindu Mahasabha : नथुराम गोडसेंचे नाव असंसदीय नाही !

Demand to remove Nathuram Godse’s name from the list of unparliamentary words : असंसदीय शब्दांच्या यादीतून नाव वगळ्याची मागणी

Nagpur ‘नथुराम गोडसे’ हे नाव असांसदीय शब्दांच्या यादीतून वगळण्यात यावे, अशी मागणी नथुराम गोडसे हिंदू महासभेने केली आहे. यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष राज्यसभा सभापती, सांसदीय कामकाज राज्यमंत्री व सांसदीय कामकाज मंत्रालय सचिव यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या मागणीमुळे आता पुन्हा एकदा नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

राज्यात महायुतीचे सरकार आहे. या सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष समविचारी आहेत. हिंदुत्वाच्या अजेंड्यावर एकत्र आलेले हे दोन्ही पक्ष आहेत. मात्र आता सरकारमध्ये भाजप-शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Sudhir Mungantiwar : ‘क्लायमेट चेंज’ धोरणात राहणार चंद्रपूरचा सहभाग !

‘नथुराम गोडसे हिंदू महासभा’चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप बाळासाहेब काळे यांनी याबाबत माहिती दिली. १९५६ सालापासून नथुराम गोडसे हे नाव असंसदीय शब्दांच्या यादीत आहे. यामागचे कारण संदीप काळे यांनी लिखित स्वरूपात लोकसभा सभापती यांना मागितले आहे.

२०१७ मध्ये मुख्य माहिती आयुक्तांनी एका माहितीच्या अधिकाराअंतर्गत चाललेल्या अपिलात नथुरामच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याला नाकारू शकत नाही. असा ऐतिहासिक निर्णय दिला होता. मात्र गांधी हत्येचे समर्थन करायचे नाही अशी अट होती. या निर्णयाला आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची जोड दिली होती.

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १९ (७) अंतर्गत, माहिती आयोगाने दिलेला निर्णय हा सर्वांना बंधनकारक असतो. जर माहिती आयोगाचा निर्णय सर्वांना बंधनकारक आहे. आयोगाने नथुरामच्या विचारांचा प्रचार व प्रसाराला संमती दिली आहे. तर हे नाव असंसदीय शब्दांच्या यादीत ठेवणे हे सर्वथा अनुचित नाही का? असा सवाल काळे यांनी केला आहे.

Workers get diarrhea due to contaminated water : दूषित पाण्यामुळे शंभर कामगारांना अतिसाराची लागण

संघाच्या भूमिकेकडे लक्ष
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात आहे. नथुराम गोडसे हिंदू महासभेने देखील नागपुरातूनच ही मागणी केली आहे. अशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोडसेंच्या संदर्भातील या नव्या वादात कुठली भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.