During work, the work has to be stopped for emergency take-off and landing of the aircraft : काम सुरू असताना विमानाचे आकस्मिक उड्डाण आणि लँडिंगसाठी काम बंद करावे लागते
Nagpur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे रिकार्पेटिंग एक महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २३ डिसेंबरला धावपट्टीची पाहणी केल्यानंतर कंत्राटदार कंपनी आणि अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र त्यांनी दिलेली मुदत २२ जानेवारीला संपली असून धावपट्टीचे काम ६० टक्केच पूर्ण झाले आहे. आता कंत्राटदार कंपन्यांना केंद्रीय मंत्र्यांच्या इशाऱ्याचीदेखील गंभीरता राहिलेली नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.
रिकार्पेटिंगच्या कंपनीला कामासाठी दररोज ८ तास मिळणे आवश्यक होते. परंतु डिसेंबर महिन्यात १७ दिवस पूर्ण आठ तासांसाठी धावपट्टी देण्यात आली नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे अर्थात नेत्यांची विमाने दुपारी धावपट्टीवर उतरत असल्यामुळे धावपट्टीचे रिकार्पेटिंग निर्धारित वेळेत पूर्ण होणार नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. धावपट्टीचे रिर्कोपेटिंगचे काम सुरू असताना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विमानाची ये-जा बंद असते.
Pankaj Bhoyar : मुंबई बँकेच्या सहकार संकुलासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद !
परंतु काम सुरू असताना विमानाचे आकस्मिक उड्डाण आणि लँडिंगसाठी काम बंद करावे लागते. नोव्हेंबर महिन्यात पूर्ण दिवस धावपट्टीचे काम सुरू नव्हते, शिवाय विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड कंपनीने डिसेंबर महिन्यातही धावपट्टी १७ दिवस पूर्ण आठ तासांसाठी उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे कामाला गती मिळाली नाही. याच कारणांमुळे नागरी उड्डयन महासंचालनालयाच्या निर्देशानुसार धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होणार होणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले आहे.
कंपनीने हॉटमिक्स प्लांट धावपट्टीपासून ८ किमी दूर बसविला आहे. त्या ठिकाणाहून प्रकल्पस्थळी मटेरियल आणण्यासाठी बराच वेळ लागतो. परिणामी कामाला उशीर होतो. शिवाय कंपनीला रोलर वाढविण्याची गरज आहे. कंपनीने प्रारंभीपासूनच सात ते आठ रोलरने काम केले असते तर बरेच काम झाले असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. रिकार्पेटिंगच्या कामाला गती देण्यासाठी कंत्राटदार के.जी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला अतिरिक्त १६० मेट्रिक टन प्रति तास क्षमतेचा हॉटमिक्स प्लांट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.