Breaking

Nitin Gadkari : सर, हेल्मटशिवाय गाडी चालवणाऱ्याला जेलमध्ये टाकता येईल का ?

 

A school student asked question to Nitin Gadkari : शालेय विद्यार्थ्याने गडकरींना विचारला प्रश्न; अनुपम खेर यांनी घेतली मुलाखत

Nagpur सर, एखाद्याने हेल्मेट लावले नसेल तर त्याच्याकडून पोलीस काका दंड घेतात. त्यानंतर त्याला सोडून देतात. पण पुन्हा तो हेल्मेट लावूनच गाडी चालवेल, याची खात्री नसते. त्यामुळे हेल्मेटसाठी दंड ठोकण्यापेक्षा एक रात्र जेलमध्ये ठेवता येईल का, असा प्रश्न एका शाळकरी मुलाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विचारला.

शालेय विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर पहिले हशा पिकला. पण नंतर त्याचे कौतुकही झाले. गडकरींनीदेखील त्याला ‘तुझी भावना खूप चांगली आहे’, असं म्हणत उत्तर दिलं. सडक सुरक्षा अभियानांतर्गत वनामती येथे आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली.

PM Narendra Modi : चक्क पंतप्रधानांच्या कार्यक्रमात चालढकल !

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना दंड ठोठावला. कायदे कडक केले; तरीही रस्ते अपघातातील मृत्यू थांबलेले नाहीत. मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत आपण यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण घेण्याच्या वयात मुलांवर चांगल्या गोष्टींचा प्रभाव पडला तर तो कायमस्वरुपी राहतो, असे गडकरी म्हणाले.

Sarpanch of Siregaonbandh special guest in Delhi : सिरेगावबांधच्या सरपंच दिल्लीत प्रमुख पाहुण्या

सुरुवातीलाच अनुपम खेर यांनी गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले. अपघातांमध्ये मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे गडकरी म्हणाले. ‘कोरोनामध्ये, युद्धामध्ये किंवा एखाद्या दंग्यामध्ये जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसेल तेवढे मृत्यू दरवर्षी रस्ते अपघातामध्ये होतात. याची मला खंत वाटते. रस्ते अपघात रोखायचे असतील तर अचूक निर्माणकार्य आणि समाजजागृती दोन्हींची आवश्यकता आहे. जनजागृतीचे कार्य शालेय स्तरापासूनच व्हायला हवे,’ असंही गडकरी म्हणाले.

या देशात आणखी उत्तम रस्ते तयार होतील. पण लोकांना शिस्त नसेल तर या रस्त्यांचा काहीही उपयोग नाही. सिग्नल तोडणे, लेन तोडून निघून जाणे, मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालणे, हेल्मेट न लावणे, सिटबेल्ट न बांधणे अशा कितीतरी चुका लोक करतात. आपली आई, पत्नी, मुले घरी वाट बघत असतील, हे ध्यानात ठेवून गाडी चालवावी, असंही गडकरी म्हणाले.

वर्षभरात होणाऱ्या अपघतांमध्ये जे मृत्यू होतात, त्यात १८ ते ३४ वर्ष वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहे. एखाद्या घरातील तरुण अचानक निघून जातो, तेव्हा त्या कुटुंबावर कोसळणाऱ्या संकटाची आपण कल्पनाही करू शकत नाही, अशा भावनाही गडकरी यांनी व्यक्त केल्या.