Breaking

Pravin Darekar : दरेकर म्हणतात, महाराष्ट्रात मराठी व्यवहाराची भाषा झाली पाहिजे!

Darekar says Marathi should become the language of business in Maharashtra : मराठी भाषा विभागाने आराखडा तयार करावा

Mumbai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात गदारोळ उठला आहे. घाटकोपर हा मुंबईचाच भाग आहे. असे असताना घाटकोपरची भाषा गुजराती आहे, असे म्हणण्याचे धाडस जोशींनी केलेच कसे, असे म्हणत काँग्रेसने त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. दरम्यान महाराष्ट्रात मराठी व्यवहाराची भाषा झाली पाहिजे, अशी भूमिका भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषद सभागृहात मांडली. भैय्याजी जोशींच्या वक्तव्यानंतर दरेकरांच्या म्हणण्याला महत्व प्राप्त झाले आहे.

सभागृहात दरेकर म्हणाले की, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी भाषेचा, महाराष्ट्राचा आणि मराठी भाषिकांचा सन्मान केला. संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम, ओडिया, बंगाली, पाली आणि प्राकृत या अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या ८ भाषांच्या पंक्तीत आपली माय मराठी आली आहे. मराठीचा प्रचार आणि प्रसारासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगत दरेकर यांनी यावेळी काही सूचना सरकारला केल्या.

Sudhir Mungantiwar : कामगारांच्या सुरक्षेसाठी कायदे कडक करा !

ते म्हणाले की, महाराष्ट्रात व्यवहाराची भाषा मराठीच असली पाहिजे. यासाठी काय करता येईल, याचा आराखडा मराठी भाषा विभागाने तयार करावा, शिक्षण, प्रशासन, न्यायदान, उद्योग-व्यवसाय, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र आणि सेवा क्षेत्र यामध्ये मराठी भाषेचाच वापर होईल, यासाठी उपाययोजना करावी, इंग्रजी शाळांचं आकर्षण वाढत असताना, मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

मराठी शाळांचे आकर्षण वाढण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात, एखादी शिक्षण तज्ज्ञांची समिती नेमावी, महाराष्ट्रात ‍ शालेय अभ्यासक्रमासाठी टु लँग्वेज पॉलिसी आणता येईल का, याचा अभ्यास व्हावा, शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, खाजगी, इंग्रजी, हिंदी माध्यम अशा महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मुलांना ५ वी, ६ वी आणि ७ वी ला मराठी आणि इंग्रजी या दोन प्राधान्याच्या व सक्तीच्या भाषा असाव्यात.

Eknath Shinde : धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही!

आठवीत मुलांना हिंदी किंवा संस्कृतपैकी एक विषय निवडण्याचा पर्याय द्यावा, राज्यातील केंद्रीय विद्यालयात शाळेत पहिलीपासून मराठी सक्तीने शिकवली जावी, महाराष्ट्रात दुकानांवर, आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्याबाबतचा २०२२ चा नियम आहे. या नियमाची संपूर्ण महाराष्ट्रात काटेकोर अंमलबजावणी करावी, प्रवास करताना प्रत्येक गावाची ओळख व्हावी, यासाठी दुकाने, हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापना यावर गावाच्या नावाचा उल्लेख मराठी आणि देवनागरीत असावा, असाही नियम आहे. सर्व ठिकाणी इंग्रजीतील पाट्या आपल्याला दिसतात. यावर कठोर उपाययोजना करावी, असेही त्यांनी सुचवले.