Review meeting held for ‘IT Park’ in Amravati : खासदार बोंडे यांनी घेतला आढावा, १६ एकरमध्ये होणार प्रकल्प
Amravati अमरावतीत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या Information & Technology वाढीस चालना देण्यासाठी १६ एकर परिसरात ‘आयटी पार्क’ उभारणीच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. या संदर्भात काही संभाव्य जागांची चाचणीदेखील पूर्ण झाली आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी उद्योग मंत्रालयाच्या ministry of industry अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रशासकीय प्रक्रिया आणि जमीन अधिग्रहण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महसूल विभागाला दिले.
राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला उद्योग मंत्रालयाचे उपसंचालक शिरसाट, उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक निलेश निकम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) विभागीय अधिकारी स्नेहा नंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर तसेच, औद्योगिक वसाहत असोसिएशनचे माजी अध्यक्ष किरण पातुरकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अमरावतीत प्रस्तावित ‘आयटी पार्क’साठी नांदगावपेठ औद्योगिक वसाहत, सातुर्णा औद्योगिक वसाहत आणि बडनेरा औद्योगिक वसाहतीतील जागांची चाचणी करण्यात आली. एमआयडीसी असोसिएशनचे माजी अध्यक्ष किरण पातुरकर यांनी यासंदर्भातील महत्त्वाच्या बाबी मांडल्या, ज्यामुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती मिळण्याची शक्यता आहे. हा आयटी पार्क प्रकल्प अमरावतीच्या औद्योगिक क्षेत्राला नवीन दिशा देण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल.
मोठ्या संधी उपलब्ध होणार
विदर्भात नागपूरमधील आयटी पार्कमुळे मोठ्या संधी निर्माण झाल्या. पण अमरावती हे झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. शिवाय लवकरच येथील विमानतळावरून मुंबईसाठी सेवा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत अमरावतीत आयटी पार्कचे निर्माण होणे एकूणच रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी फायद्याचे ठरणार आहे, असा विश्वास सरकारला आहे.