Breaking

PM AWAS YOJANA: नागपुरात केवळ ५० घरकुलांचे काम पूर्ण

Only 50 houses completed in Nagpur : पंतप्रधान आवास योजना ठरले दिवास्वप्न

Nagpur केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून शहराप्रमाणेच ग्रामीण भागात लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जाते. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांसाठी घरकुल दिवास्वप्न ठरत आहे. २०२४-२५ या वर्षात घरकुल मंजूर झालेल्या ६ हजार ७७ लाभार्थ्यांपैकी फक्त ५० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना हप्त्याची प्रतीक्षा असल्याने झोपडीत किती दिवस राहायचे, असा सवाल हे लाभार्थी करीत आहेत.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जाते. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधकामासाठी एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. पंचायत समिती स्तरावर ही योजना राबविले जाते. परंतु आधीच तुटपुंजे अनुदान असून तेही वेळेवर मिळत नाही. प्रधानमंत्री आवास योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून पंचायत समितीमार्फत राबविली जाते.

Local body elections: सभापतिपदाची हुलकावणी; तिरखेडीत नाराजी

२०२४-२५ या वर्षासाठी ७ हजार ३११ घरकुलांचे लक्ष्य देण्यात आले. ६ हजार ७७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या ५० इतकी आहे. घरकुल योजनेसाठी पाच टप्प्यात अनुदान मिळते. तेही वेळेत मिळत नसल्याचे चित्र आहे. अपूर्ण घरांची संख्या मोठी आहे. अनुदानाचा कुणाला पहिला, काहींना दुसरा तर कुणाला तिसरा हप्ता मिळालेला नाही. चौथ्या व पाचव्या हप्त्याची अशीच स्थिती आहे.

Local body elections: निवडणुकीपूर्वी पर्यटनाला गेलेले सदस्य शुक्रवारी परतणार

निधी वेळेत न आल्यास बांधकाम रखडते. परिणामी घरकुल बांधकामाला विलंब होत आहे. अनेक लाभार्थी घरकुल मंजूर होताच घर पाडून बांधकाम सुरू करतात. मात्र त्यांना निधीसाठी पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागत असल्याचे वास्तव आहे.