Breaking

Ramtek festival: रामटेक महोत्सवात उदित-आदित्‍य नारायण यांनी केली धमाल

 

Udit and Aditya Narayan won public’s heart : श्रोत्यांना सुरांची मेजवानी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांची उपस्थिती

Ramtek रामटेक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पद्मभूषण, पद्मश्री उदित नारायण व आदित्य नारायण यांनी आपल्या लोकप्रिय गाण्याद्वारे प्रेक्षकांना भुरळ घातली. ‘बडे मियां तो बडे मियां छोटे मियां सुभान अल्ला’ असे म्हणत आदित्य नारायण यांनी पद्मभूषण उदित नारायण यांना आदरपूर्वक स्टेजवर आमंत्रित केले. ‘पापा कहते है’ गाणे त्यांनी सादर करीत रसिकांची मने जिंकली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांची विशेष उपस्थिती होती.

रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाच्‍या दुसरा दिवशी पद्मभूषण, पद्मश्री उदित नारायण यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ आयोजित करण्‍यात आली. उदित नारायण , आदित्य नारायण यांच्या जोडीने आपल्‍या सुमधूर आवाजातील जुन्‍या व नवीन गीतांनी रामटेककरांना भूरळ घातली. या जोडीने एका पेक्षा एक गाणे गाऊन मने जिंकली.

Municipal Corporation Elections : मनपा निवडणूकीसाठी सरसावल्या नागपुरातील आंबेडकरवादी संघटना

‘आदित्य’ चे सरप्राइज
उदित नारायण यांच्‍या वाटेकडे डोळा लावून बसलेल्‍या रामटेककरांना छोटे मियॉं आदित्‍य नारायण सरप्राइज एन्‍ट्री करत धक्‍का दिला. ‘ठोको सलाम ठोको ‘ म्हणत आदित्य यांनी मोठ्या संख्येने उपस्‍थ‍ित तरुणाईला आपल्या तालावर थिरकायला लावले. ‘शायद कभी न कह सकु’, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे’, ‘केसरिया मेरा इश्‍क’ वर तरुणाईने साथ दिली. ९० च्या दशकातील ‘आना ही पडा सजना’ वादा रहा सनम, रामजी की चाल देखो अशी विविध गाणी सादर करीत रामटेककरांची मने जिंकली.

पुष्पाभाऊ आणि ऐश्वर्या सहाने केले मनोरंजन
लोकप्रिय ‘पुष्पा’ चित्रपटातील संवाद आणि गाणी यावर आधारित स्किट ने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर सारेगामापा फेम गायिका ऐश्वर्या सहा यांनी त्यांनी आपल्या सादरीकरणाने सुरेल मेजवानी दिली. जरा जरा महाकता है, मेरे ख्वाबो मे जो आये, अशी सदाबहार गाणी तिने सादर केली. ढोलताशा पथक, आदिवासी नृत्‍यानेही मजा आणली.

Nagpur police : दोन हत्याकांडांनी हादरली उपराजधानी

24 रोजी महोत्सवाचा समारोप
मनोरंजनाची भरपूर मेजवानी मिळाल्यानंतर पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचा 24 जानेवारी रोजी समारोप होत आहे. ‘छय्या छय्या’ फेम सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्या ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ने महोत्सवाचा समारोप होईल.