Constables beat the hotel owner and demanded five lakhs : हॉटेलमालकाला मारहाण करीत मागितले पाच लाख
Nagpur एका कॅफेच्या संचालकाला सीताबर्डी पोलीस ठाण्यात बांधून जबर मारहाण केली. त्यानंतर पाच लाख रुपयांची मागणी केली. हे वसुलीचे प्रकरण उघडकीस येताच दोन्ही वसुलीबाज पोलीस हवालदारांना सेवेतून निलंबित करण्यात आले. प्रवीण वाकोडे आणि समाधान कांबळे अशी निलंबित करण्यात आलेल्या वसुलीबाज हवालदारांची नावे आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा नागपूर पोलीस चर्चेत आले आहेत. पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास कमी होत असल्याचे बोलले जात आहे.
३१ डिसेंबरला वेस्ट हायकोर्ट रोडवर असलेल्या यश दुबे यांच्या ‘फर्जी’नावाच्या कॅफेमध्ये सायरस आणि त्याची मैत्रिण आले होते. दोघांनी कॉफी घेतल्यानंतर कोणत्यातरी कारणावरुन दोघांत वाद झाला. दोघांमधील वाद वाढल्यानंतर सायरस याने त्या मैत्रिणीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे त्या महिलेने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सीताबर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
Nagpur airport : विमानतळ विस्तरिकरणातून उद्योगांना ‘बूस्टर डोस’
उपनिरीक्षक कविता जगताप यांनी तपासाची ‘केस डायरी’ पोलीस ठाण्यातील आपल्या कपाटात ठेवली. मात्र, पोलीस हवालदार प्रवीण वाकोडे आणि समाधान कांबळे यांनी पोलीस उपनिरीक्षक जगताप यांच्या कपाटातील ‘केस डायरी’ चोरली. अधिकार नसताही तपास सुरु केला. हॉटेलचा संचालक सायरस याला हवालदार प्रवीण वाकोडे याने फोन केला. आणि तपास करायचा असल्याचे सांगितले. पोलीस ठाण्यात बोलावले. सायरस यांना गुन्ह्यात वाढ करण्याची धमकी दिली.
त्यानंतर त्याला दोरीने बांधून जबर मारहाण केली. त्यानंतर गुन्ह्यातून वाचायचे असल्यास त्याला पाच लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या सायरस याने दोन्ही हवालदारांना पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या दोघांनी त्याला पुन्हा मारहाण केली. त्याने पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याकडे तक्रार केली.
पाच लाखांत वाटा कुणाचा?
दोन्ही पोलीस हवालदारांनी सायरस याला पाच लाखांची मागणी केली. हे पैसे हवालदारांनी कुणासाठी मागितले होते, हा प्रश्न कायम आहे. पैसे मिळाले असते तर त्यामध्ये वाटा कुणाचा असता, हाही प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. त्यामुळे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच सीताबर्डीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांना या प्रकरणात विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.