Files and checkbook also on a trip to Phaltan with BDO Madam : आमसभेसाठी आमदारांना फलटणला बोलावणार का? तालुक्यात संताप
Buldhana पंचायत समिती बुलडाण्याच्या गट विकास अधिकारी (बीडीओ) डॉ. अमिता पवार यांच्या कामकाजातील अनागोंदी आणि वारंवार घेतलेल्या रजा यामुळे तालुक्यात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. रजेवर असतानाही बीडीओ पवार यांनी पंचायत समितीच्या महत्त्वाच्या फाईली आणि चेकबुक स्वतःच्या फलटण येथील निवासस्थानी पाठवण्याची व्यवस्था केली आहे, अशी विश्वसनीय माहिती समोर आली आहे.
२९ एप्रिल रोजी पंचायत समितीची वार्षिक आमसभा होणार आहे. मात्र बीडीओच्या अनुपस्थितीमुळे ही आमसभा फलटणला हलवावी लागेल का, आणि त्यामुळे बुलढाणा व चिखली विधानसभा मतदारसंघातील आमदार संजय गायकवाड व श्वेता महाले यांनाही फलटण गाठावे लागणार का, अशी उपरोधिक चर्चा सध्या वर्तुळात रंगली आहे.
Terrorist attack in Pahalgam : काळी फित बांधून भ्याड हल्ल्याचा निषेध!
पंचायत समितीच्या कामकाजात गोंधळ सुरू असताना दोन्ही आमदारांनी अद्याप मौन का बाळगले आहे, असा सवाल कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक विचारत आहेत. जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी होणाऱ्या आमसभेवर बीडीओंच्या अनुपस्थितीमुळे गडबड निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्याकडून बीडीओ डॉ. अमिता पवार यांना मिळालेल्या विशेष मुभेबाबतही पंचायत समिती व जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ३० एप्रिलपर्यंत पूर्ण झालेल्या कामांची देयके अडवू नयेत म्हणून त्यांनी विशेष सूट दिली आहे. मात्र, बीडीओंच्या अनुपस्थितीत विकास निधी खर्चाचे नियोजन कोलमडले असल्याची टीका होत आहे.
Pehalgam terrorist attack : बुलडाण्यातील पाच जण पहेलगाममध्ये अडकले!
पंचायत समितीतील कामे रखडली असून, चेकबुक व फायली फलटणला जाणार असल्याने विकासकामांच्या निधी वितरणात आणखी अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.