Old records of Nagpur municipal corporation will be cancelled : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 100 दिवसांचा कार्यक्रम
Nagpur प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी महापालिकेकडे सद्यस्थितीत असलेले जुने रेकॉर्ड रद्द करण्यात येणार आहेत. याअंतर्गतच रेकॉर्डची विल्हेवाट लावण्यासाठी सहा गठ्ठा पद्धत अवलंबिली जाणार आहे. परंतु अतिमहत्त्वाची कागदपत्रे मात्र राखून ठेवली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना शंभर दिवसांचा कार्यक्रम आखून दिला आहे. त्याअंतर्गतच मनपाकडून यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
महापालिकेकडून प्रशासकीय कामकाजाशी संबंधित विविध उपक्रम राबविले जाणार आहे. १०० दिवसांच्या कार्यक्रमात महापालिकेची वेबसाईट अपडेट करणे, कार्यालयांमध्ये नियमित साफसफाई व स्वच्छता करणे, शासकीय कार्यालयातील जुनी वाहने, स्क्रॅप वाहनांची विल्हेवाट लावणे याचा समावेश आहे. यासोबतच नागरिकांसाठी असलेल्या सोयीसुविधांमध्ये नव्याने दोन उपक्रम सुरू करणे, नागरिकांकडून प्राप्त तक्रारींचा वेळच्यावेळी निपटारा करणे आदींचा समावेश आहे.
Hair loss disease : चर्चा, बैठकांमध्ये केस गळतीचा लागेना सोक्षमोक्ष !
सरकार व इतरही सर्व ॲपवरील तक्रारींची नियमित आढावा घेऊन संपूर्ण तक्रारीचा निपटारा करणे, लोकशाही दिन राबविणे याचा समावेश आहे. नागरिकांना भेटण्यासाठी अधिकाऱ्यांच्या वेळ निश्चित करणे व भेटीसाठी राखीव वेळ कोणती तसा बोर्ड कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावणे, कार्यालयातील पब्लिक टॉयलेट बाथरूमची नियमित स्वच्छता करणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे देखील होणार आहे.
Shivsena Uddhav Balasaheb thakarey : शिवसेनेचे ‘एकला चलो’ छोट्या गावांमधून
शहरात सुरू असलेल्या किंवा होणाऱ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणे, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी संवाद साधणे, सर्व विभागांच्या आधिपत्याखालील सुरू असलेल्या कामांना भेटी देणे, महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, हॉस्पिटल, अंगणवाड्यांची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेणे आदी उपक्रमांचा यात समावेश आहे.
कार्यालय स्वच्छतेचा भाग म्हणून महापालिकेकडे प्राप्त असलेल्या रेकॉर्ड सहा गठ्ठे पद्धतीनुसार व्यवस्थित ठेवले जाणार आहे. अनावश्यक असलेले रेकॉर्ड विहित प्रक्रिया अवलंबून नष्ट केले जाणार आहे. जुने रेकॉर्ड, रद्दी पेपर, जुने फर्निचरचा लिलाव केला जाणार आहे.