Breaking

CM Devendra Fadnavis, Nagpur Police : लहान भावापुढेच मोठ्या भावाचा निर्घृण खून!

 

The brutal murder of the elder brother in front of the younger brother : गृहमंत्र्यांच्या शहरात चाललेय काय?

Nagpur राज्यात हत्याकांडाच्या घटना वाढत असतानाच नागपुरात सलग हत्याकांडाची मालिका सुरु झाली आहे. अगदी क्षुल्लक कारणातून चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. ही घटना नागपुरातील धंतोली परिसरात घडली. लकी ऊर्फ करण राजेश नायकर (२८, रा. तकिया, धंतोली) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर कुणाल राऊत, त्याची पत्नी काजल राऊत, मेहुणा योगेश कोवे आणि मामा रुपेश वाघाडे अशी आरोपींची नावे आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने २०१४ मध्ये पहिल्यांदा नागपूरला गृहमंत्रिपद मिळाले. त्यानंतर २०१९ मध्ये नागपूरचेच अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री झाले. दरम्यान राजकीय उलथापालथ झाली आणि महायुतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा एकदा गृहमंत्रिपद आले.

Nagpur Municipal Corporation : नागपुरात होणार स्वच्छता सर्वेक्षण!

महायुतीच्या दुसऱ्या टर्ममध्येही तेच गृहमंत्री आहेत. आता तर ते मुख्यमंत्रीही आहेत. पण गेल्या दहा वर्षांमध्ये परिस्थिती बदललेली नाही. गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपराजधानीत गेल्या वर्षभरात ९१ हत्याकांड घडले आहेत. नव्या वर्षातही हत्याकांडांच्या घटना घडत आहेत. त्यानंतर पुन्हा एका हत्याकांडाने उपराजधानी हादरली आहे.

लकी नायकर आणि आरोपी कुणाल राऊत हे दोघेही मित्र होते. दोघेही सोबतच दारु आणि पार्ट्या करीत होते. दिवाळीत दोघांमध्ये दारु पिण्यावरुन वाद झाला. त्यावेळी लकीने कुणालला जबर मारहाण केली होती. कुणालने धंतोली पोलीस ठाण्यात लकीविरुद्ध तक्रार दिली. लकीवर गुन्हा दाखल केला. लकीवर गुन्हा दाखल होताच त्याच्या वडिलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता.

Dharmapal Meshram : सत्तेविना शरद पवार वैफल्यग्रस्त

वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे लकी हा कुणालला जबाबदार ठरवत होता. तेव्हापासून तो कुणालचा राग करीत होता. लकी हा नेहमी कुणालला शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. त्यामुळे कुणाल हा लकीच्या त्रासाला कंटाळला होता.

मैदानावरच केला खून
मंगळवारी रात्री अकरा वाजता लकी हा तकीया मैदानावर मित्रासोबत बसला होता. दरम्यान, तेथे कुणाल राऊत आला. नेहमीप्रमाणे लकीने त्याला शिवीगाळ केली. दोघांत मारहाण झाली. दरम्यान, कुणालची पत्नी काजल राऊत, मेहुणा योगेश कोवे आणि मामा रुपेश वागळे तेथे आले. चौघांनी लकीला पकडले आणि त्याच्या पोटात चाकू भोसकून खून केला. त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून चौघांनीही पळ काढला.