Breaking

Ajit Pawar : अजितदादांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा पुण्यासारखा विकास होईल !

It is my own decision not to seek the post of Guardian Minister at this time : सद्यस्थितीत पालकमंत्री पद नको ही माझी स्वतःचीच भूमिका

Maharashtra Politics : आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची पुण्यासह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वागत केले. अजित दादांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. अजित दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याचा पुणे जिल्ह्याप्रमाणे विकास व्हावा, अशी अपेक्षाही मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

बीड जिल्ह्यात सध्या सुरू असलेली सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे आपणच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मला न करता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावे अशी विनंती केली होती, असेही धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Akash Fundkar : वडिलांच्या कर्मभूमीचे नेतृत्व आता मुलाकडे

तसेच सद्यस्थितीमध्ये मला कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाऊ नये, याबाबतही आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विनंती केली होती. त्यांनी ती मान्य केल्याबद्दल त्यांचे आभार धनंजय मुंडे यांनी मानले आहेत. आपल्यावर देण्यात आलेल्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कडार आपले निकटवर्तीय आहेत, ते स्वतः धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर सांगितले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरही या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने लावून धरण्यात येत आहे. मुंडेंचा राजीनामाही मागण्यात येत आहे.

Guardian Minister of Maharashtra : पालकमंत्र्यांची बहुप्रतिक्षीत यादी अखेर जाहीर !

देशमुख कुटुंबीयांचाही रोष धनंजय मुंडे यांच्यावर आहे. अशा परिस्थितीत मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला नाही, हीच मुंडेंसाठी मोठी गोष्ट आहे. पण त्यांना पालकमंत्री केल्यास सरकारची मोठी बदनामी होणार होती. आणि हा धोका सत्ताधाऱ्यांना घ्यायचा नव्हता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद दिलेले नाही. यातून डॅमेज कंट्रोल करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो आहे.