40 teams were deployed at 40 centers, police security and CCTV surveillance : ४० केंद्रांवर ४० पथक होते तैनात, पोलीस बंदोबस्त अन् सीसीटिव्हीची निगराणी
Buldhana News : जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ६ वीसाठी आज जिल्ह्यातील ४० केंद्रांवर निवड चाचणी परीक्षा सुरुळीत पार पडली. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून तब्बल १२,०७३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी ११,५३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी दिली.
या निवड चाचणी परिक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सीसीटिव्हीची निगराणी ठेवण्यात आली होती. तसेच परिक्षेचे कामकाज सुरळीतपणे चालण्याकरिता जिल्ह्यातील १३ तालुक्यामध्ये तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाची नेमणुक करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदारांनी परिक्षेदरम्यान परीक्षा केंद्रास भेटी देवून परीक्षा केंद्रांची पाहणी केली. या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर निगराणीसाठी महसूल विभागाची यंत्रण कार्यरत होती.
The birth rate of girls increased : जिल्ह्याला लक्ष्मी पावली, मुलींचा जन्मदर वाढला !
या परिक्षेचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने ४० बैठे पथकांचीही नेमणूक करण्यात आली होती. या पथकांमुळे परीक्षा केंद्रावर कॉपी विरहीत परीक्षा पार पडण्यास मदत झाली.
“जिल्ह्यातील ४० परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली. या परीक्षा केंद्रावर तसेच प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवून होतो. कोणत्या परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदार घेतली होती. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रावर सर्व सोयीसुविधा देण्यात आल्या होत्या. त्यांच्या पालकांनीसुद्धा प्रशासनाला सहकार्य केले. एकंदरीत जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पडली,”अशी माहिती जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी दिली.