Breaking

Educational Quality Conference : शिक्षकांचे काम म्हणजे उद्योगधंदा नाही !

 

CEOs advise students to develop knowledge with a selfless attitude : त्यागी वृत्तीने ज्ञानदान करुन विद्यार्थी घडवावे, सीईओंचा सल्ला

Buldhana News : शासकीय सेवेत शिक्षण कार्य करताना शिक्षकांनी त्याला उद्योगधंदा म्हणून स्थान देऊ नये, तर त्यागी वृत्तीने ज्ञानदान करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले. जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाच्यावतीने शैक्षणिक गुणवत्ता संमेलनाचे आयोजन 17 जानेवारी रोजी सहकार विद्या मंदिर, बुलडाणा येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश राठोड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जे. ओ. भटकर, अधिव्याख्याता समाधान डुकरे, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, अनिल देवकर आणि पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत तयार करण्यात आलेल्या “प्रेरणादायी शाळा सृजन लेखमाला”, “शिक्षणानंद”, “समावेशित शिक्षणातून दिव्यांगांचा विकास” यांसारख्या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

Navoday Students : ११,५३६ विद्यार्थ्यांनी दिली ‘नवोदय’ची निवड चाचणी परीक्षा

नवउपक्रम स्पर्धेतील विजेते शिक्षक:
जिल्हास्तरीय नवउपक्रम स्पर्धा 2024-25 च्या प्राथमिक व माध्यमिक गटातील विजेते व उत्तेजनार्थ शिक्षकांना पारितोषिक देण्यात आले. विनोबा ॲप प्रोत्साहनपर पुरस्कार: जिल्हा परिषद व ओपन लिंक फाऊंडेशन यांच्या सामंजस्य करारानुसार उपक्रमशील शिक्षकांना विनोबा ॲपच्या माध्यमातून प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Accident : तीन वाहनांच्या अपघातात तीन ठार, आठ गंभीर जखमी

सुगम पाठशाळा अंतर्गत साहित्य वितरण:
जिल्ह्यातील 14 शाळांना संगीत साहित्य (हार्मोनियम व तबला) मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी केले. संचालन अरविंद शिंगाडे यांनी केले. आभार अंजली नेटके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.