Breaking

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचं भविष्य ‘हम दो – हमारे दो’, बावनकुळेंचे जोरदार प्रत्युत्तर !

Even after 13 MPs and 50 MLAs leave, he doesn’t wake up : १३ खासदार आणि ५० आमदार निघून जातात, तरी त्याला जाग येत नाही

Nagpur News : विधानसभा निवडणुकीत झालेला दारूण पराभव आणि जनमाणसात ढासळत चाललेली प्रतिमा बघता, कुठल्याही नेत्याने आत्मपरीक्षण केले असते. पण उद्धव ठाकरे मात्र भाजप आणि भाजप नेत्यांना दोष देण्यात धन्यता मानत आहेत. सगळेच त्यांना सोडून गेले. लवकरच ‘हम दो – हमारे दो’ अशी त्यांची परिस्थिती होणार आहे, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. याबाबत आज (२४ जानेवारी) पत्रकारांनी मंत्री बावनकुळे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी उपरोक्त उत्तर दिले. ते म्हणाले, एका पक्षाच्या नेत्याकडून १३ खासदार आणि ५० आमदार निघून जातात, तरी त्याला जाग येत नाही, याला काय म्हणावे? खरं तर त्यांचे नेतृत्वच कुणी मान्य करायला तयार नाही. त्यामुळेच खासदार आणि आमदारांचा त्यांच्याशी संपर्क नव्हता. आता याला – त्याला दोष देऊन काहीही होणार नाहीये.

Sudhir Mungantiwar : बँकेच्या आरक्षण संपवणाऱ्या धोरणा विरोधात मुनगंटीवार कडाडले..

त्यांचे लोक सोडून गेल्यावर भाजपला दोष देण्यात किंवा अमित शाह यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. 2019 मध्ये ते भाजपसोबत निवडून आले आणि भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. त्यांनी गद्दारीची सुरूवात केली झाली नसती, तर या महाराष्ट्राचं चित्र आज काही वेगळं असतं. उद्धव ठाकरे निराश आहेत. असं बोलणं म्हणजे वेडेपणाचे लक्षण आहे, असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.

हा उद्धव ठाकरेंचा बिनडोकपणा आणि आदित्यचा बालीशपणा आहे. अजूनही ते सुधारत नाहीये. मला वाटतं अमित शाह यांच्यावर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून त्यांना काहीही साध्य होणार नाही. जी परिस्थिती आज आहे, त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल. आणि आमचं जनमत अजून वाढेल. उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसागणिक ढासळत जाईल. ज्या घटनेला ते स्वतः जबाबदार आहेत, त्या घटनेवर त्यांचे बोलणे, याला महाराष्ट्राची जनता कंटाळली आहे.

Bicycle rally : सायकल रॅलीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश 

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर केलेल्या टिकेबाबत विचारले असता, ती आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आहे. त्या ठिकाणी सर्वच बिझनेसमन येतात. मग देशातील करार असो की विदेशातील. आदित्य ठाकरेंना हे कळत नाही. ते बालिश आहेत. त्यांना अजून सरकार पूर्णपणे कळलं नाही. दोन वर्ष पर्यटन मंत्री होते. ते पर्यटनच करत राहिले. सरकारमधील मूळ गाभा त्यांना कळला नाही, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले.

17 लाख हजार कोटींची गुंतवणूक आणली आहे. मात्र हे लोक सुधारत नाही आहेत. विदर्भासाठीही मोठी गुंतवणूस आणलेली आहे. हा महाराष्ट्र आता थांबणार नाही. विकसित महाराष्ट्र होणार आहे. एकनाथ शिंदे सरकार आणि आता फडणवीस सरकारचे काम जोरदार सुरू आहे. विदर्भाचे जे मागासलेपण होते, ते दूर होतेय. गडचिरोलीपासून बुलढाण्यापर्यंत सर्व मागासलेपण दूर होणार आहे, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.