Breaking

Sameer Kunawar : फक्त एका आमदाराकडे शस्त्र !

Only one MLA has a weapon in Wardha district : जिल्ह्यात एकूण चार आमदार; इतरांकडे ना शस्त्र ना परवाना

Wardha वर्धा जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, चारपैकी फक्त एकाच आमदाराकडे शस्त्र आहे. इतर तिघांकडे ना शस्त्र आहे ना, शस्त्र परवाना आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे चौघांपैकी केवळ एकाच आमदाराला स्वसंरक्षणाची चिंता असल्याची चर्चा होत आहे.

जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्राचा विचार केल्यास दोन आमदार पुन्हा निवडून आले आहेत. तर दोन आमदार नव्याने निवडून आले आहेत. त्यामुळे यातील किती आमदारांकडे शस्त्र परवाना आहे, याची माहिती जाणून घेतली गेली. त्यावेळी हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार वगळता एकाही आमदाराकडे शस्त्र किंवा शस्त्र परवाना नसल्याची माहिती मिळाली आहे.

Minister of State Indranil Naik : प्रत्येकाने वाचावे भारताचे संविधान

प्रशासनाकडून स्वत:च्या संरक्षणाकरिता शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली जाते. यामध्ये राजकीय व्यक्ती प्रशासनाकडून शस्त्र वापरण्याची परवानगी मिळवित असतात. आमदार झाले की, ते आपल्या स्वसंरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शस्त्र परवाना काढून घेतात. पण, चारपैकी केवळ समीर कुणावार यांच्याकडेच शस्त्र परवाना आहे. अद्यापही तीन आमदारांकडे तसेच खासदारांकडेही शस्त्र परवाना नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

आता शासनाकडून आमदारांना सुरक्षा रक्षकही दिला जात असल्यामुळे कदाचित त्यांना शस्त्र परवाना काढण्याची आवश्यकता भासत नाही. विशेषत: जिल्हा शांततेचे प्रतीक असल्यामुळेही या परवान्याची आवश्यकता पडत नाही. खासदार अमर काळे यांच्याकडे बंदूकही नाही व त्याचा परवानाही नसल्याची माहिती आहे.

Archaeological Department of Maharashtra : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं येणार नागपुरात

डॉ. पंकज भोयर यांच्याकडे कोणत्याही प्रकारची बंदूक नसून त्यांनी तसा परवानाही घेतलेला नाही. आमदार समीर कुणावार यांच्याकडे बंदूक असून, त्याचा परवानाही त्यांच्याकडे असल्याची माहिती आहे. आमदार सुमित वानखेडे पहिल्यांदाच ते आमदार झाले आहेत. त्यांच्याकडे देखील शस्त्र नाही. आमदार राजेश बकाने देवळी मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्याकडेही शस्त्र नाही.

का घेतला जातो शस्त्र परवाना?
स्वत: संरक्षणासाठी आपणही शस्त्र परवाना काढू शकतो. त्याकरिता पोलिस प्रशासनाकडून आपली पडताळणी केली जाते. खरेच जिवाला धोका होण्याची शक्यता आहे का? याची तपासणी केल्यानंतरच परवाना देण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. यामध्ये राजकीय व्यक्ती, मोठे व्यावसायिक किंवा मोठ्या अधिकाऱ्यांनाही शस्त्र परवाना मिळू शकतो. शस्त्र परवाना मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्या अर्जासोबत आपल्याला शस्त्र परवाना कशासाठी हवाय, याची संपूर्ण माहिती व पुरावाही जोडावा लागतो.