Administration’s failure to stop teak smuggling like a pushpa is in full swing : नद्यांमार्गे सागवान तस्करी; शेजारच्या तेलंगणात जातोय ‘माल’
Pushpa at Sironcha महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा येथील मौल्यवान सागवान प्रसिध्द आहे. मात्र, येथे अनेक ‘पुष्पा’ सक्रिय झाल्याने तस्करी रोखण्याचे आव्हान उभे झाले आहे. यासंदर्भात कडक उपाययोजना कधी होणार, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला आहे. विशेष म्हणजे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही शंका व्यक्त होऊ लागली आहे. शिवाय राजकीय हस्तक्षेपाची शंकाही काही लोकांनी व्यक्त केली आहे.
Gadchiroli जिल्ह्यातील सिरोंचा तालुका तेलंगणा राज्याच्या सीमेलगत आहे. तालुका सीमेतून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. सागवान तस्कर गोदावरी या मुख्य नदीसह या नद्यांमार्गे तेलंगणा राज्यात सागवानाची तस्करी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कमी कालावधीत अधिक मिळकत प्राप्त होत असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात सागवान तस्कर सक्रिय आहेत.
तालुक्यातील मौल्यवान सागवानाची तेलंगणा राज्यात तस्करी करण्याचा प्रकार मागील अनेक वर्षापासून सुरु आहे. यात काही स्थानिक लोकही सहभागी असल्याची शंका आहे. यासंदर्भात उपवनसंरक्षकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
Beed Incident Impact : 400 सरपंच धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर !
सिरोंचा वनविभागांतर्गत आठ वनपरिक्षेत्र येतात. या सर्व ठिकाणी वनतस्करी, वृक्षतोड, जंगलात वणवा लागून वनसंपदा नष्ट होण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. यासंदर्भात चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे, असं आता सामाजिक कार्यकर्ते बोलू लागले आहेत.
वनविभागाच्या कारवाया थंडावल्या..
दीड वर्षांपूर्वी वनविभागाने तेलंगणात जाऊन छापेमारी करत कारवाई केली होती. मात्र, सरत्या वर्षात मोठी कारवाई झाली नाही. याचाच फायदा घेत तस्करांचा धुमाकूळ वाढल्याचे चित्र आहे.