Until then, it is not appropriate to talk about Dhananjay Munde : चौकशीत जे दोषी येतील, त्यांना फासावर लटकवलं पाहिजे
Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधक आरोप करत आहेत. तो लोकशाहीतील त्यांचा अधिकार आहे. विरोधकानी काय करावं ही त्यांची भूमिका आहे. पण प्रकरण कोर्टात आहे. चौकशीतून जे दोषी येतील, त्यांना फासांवरच लटकवलं पाहिजे. एकही मारेकरी सुटू नये, हीच भूमिका शिवसेनेची आहे. जोपर्यंत चौकशी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही. तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलणं योग्य वाटत नाही, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.
नागपुरात पत्रकारांशी मंत्री उदय सामंत बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येकाचा मनात काय असतं, कुठं जायचं, हे कुणी सांगत नाही. दिल्लीतील पत्रकार परिषदेत वज्रमुठ असल्याचं त्या लोकांनी सांगितलं. ती मूठ किती दिवस टिकते ते बघूया. कोणी आव्हान दिलं म्हणून प्रतिआव्हान देत गरजेचं नसतं. एकनाथ शिंदे यांची भूमिका उबाठाच्या लोकांना पटली. त्यामुळे त्यांचे लोक इकडे येण्यास उत्सुक आहेत. त्यांचे 10 ते 12 माजी आमदार, खासदारकीचे आणि आमदारकीचे उमेदवार एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारतील आणि त्याची सुरुवात झालेली आहे.
CM Devendra Fadnavis : ‘विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी’साठी 100 एकर जागा
राजन साळवी यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. याबद्दल विचारले असता, एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझी चर्चा झालेली नाही. यावर सविस्तर चर्चा करू. राजन साळवी पक्षात येताना त्यांचा इच्छा आकांक्षा काय आहेत, हे जाणून घ्यावे लागेल. माझे मोठे बंधू त्यांचा पराभव करून निवडून आले. माझे बंधू यांनाही विश्वासात घ्यावे लागेल. सगळ्या बाबींचा विचार करुन यावर निर्णय होईल.
सविस्तर चर्चा झाली की नाही, या सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगायची गरज नसते. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात काम करण्यासाठी मोठी मुव्हमेंट महाराष्ट्रात सुरू आहे. त्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. माझ्याकडे 15 तारखेला आभार दौरा आहे. त्यातही मोठे बदल झालेले दिसतील, असेही उदय सामंत म्हणाले.