Green Signal for AYUSH Hospital Fund in Wardha : म्हासाळा येथील प्रकल्पाकरिता साडेदहा कोटींचा निधी मंजूर
Wardha केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष कार्यक्रमातंर्गत वर्धा येथे 30 खाटांचे आयुष रूग्णालय मंजूर करण्यात आले आहे. या रूग्णालयाच्या बांधकामासाठी 13.78 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केंद्रिय आयुष राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव यांच्याकडे केली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे रूग्णालयाच्या बांधकामासाठी 10 कोटी 50 लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आयुर्वेद उपचाराची पध्दती ही फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. प्राचीन काळात आयुर्वेद पद्धतीने उपचार करण्यात येत होते. आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात घेवून सध्या या पध्दतीने उपचार घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने प्रत्येक जिल्ह्यात आयुष रूग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्धा येथे राष्ट्रीय आयुष कार्यक्रमातंर्गत ३० खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. या रुग्णालयासाठी जि.प. ने शहरालगतच्या म्हसाळा ग्राम पंचायत क्षेत्रातील सर्वे क्रमांक 29 मधील जागा उपलब्ध करून दिली आहे.
Eknath Shinde : आम्ही अंगावर केसेस घेतल्या म्हणून शिवसेना मोठी झाली, मात्र..
या जागेवर रूग्णालय बांधण्याचा प्रस्ताव संपूर्ण आराखड्यासह आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालकाकडे सादर केला आहे. आयुष रुग्णालयाच्या बांधकामासाठी 13.78 कोटी रूपयांची मागणी करण्यात आली आहे. मात्र या प्रस्तावास मान्यता देण्यात न आल्याने रूग्णालयाचे बांधकाम सुरू झाले नव्हते. नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या रूग्णालयासाठी तातडीने निधी देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे 19 जुलै रोजी केली होती.
Nana Patole : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना लवकरच आला सत्तेचा माज !
आयुष रूग्णालयासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. वैद्यकीय अधिकारी राष्ट्रीय आयुष अभियानाचे डॉ. अविनाश भागवत यांनी यासंदर्भात पत्र काढले आहे. रूग्णालयासाठी 10 कोटी 50 लक्ष रूपयांचा निधी मंजूर केला आहे. तथापि, निधी मंजूर झाल्यामुळे रूग्णालयाच्या निर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे.