Ashok Uike brought Moha flower alcohol in the cabinet meeting : चुकीने एकही दारूची बाटली पत्रकारांच्या हाती लागली असती तर…
Mumbai मंत्रिमंडळाच्या बैठकीत जर कुणी दारू आणली तर काय गहजब होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. पण हा प्रकार नुकताच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घडला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना भेटवस्तू म्हणून मोहाची दारू आणली. हे बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पारा भडकला.
झाले असे की, ४ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. बैठक झाल्यानंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तुचे गिफ्ट हॅम्पर सर्व मंत्र्यांना वाटप करू देण्याची विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना केली. आदिवासींनी तयार केलेल्या वस्तू भेट म्हणून द्यायच्या असल्याने मुख्य्मंत्र्यांनीही उईके यांना तशी परवानगी दिली.
Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्र्यांचा Effect! शंभर वर्षांमध्ये प्रथमच होतेय हे काम!
भेटवस्तू काय आहे, अशी विचारणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंना केली. त्यावर गिफ्ट हॅम्परमध्ये मोहाच्या दारूची बाटली असल्याचे उईकेनी सांगितले. हे ऐकताच मुख्यमंत्र्यांचा पारा भडकला. ते जागेवरून तडकन उठले आणि ‘अहो.. हा काय प्रकार आहे..? हे काय करताय..?’, असे म्हणत तात्काळ ती बाटली काढून घ्या आणि हॉलच्या बाहेर न्या, अशा शब्दांत उईकेंना खडसावले.
Akola Zilla Parishad : जिल्हा परिषदेत अधिकार्यांचे ‘प्रभारनाट्य’ !
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे पुढील ‘एपीसोड’ टळला. कारण हॉलच्या बाहेर पत्रकार हजर होते. चुकीने एकही दारूची बाटली पत्रकारांच्या हाती लागली असती तर गहजब झाला असता. विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले असते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मोहाच्या दारूच्या सर्व बाटल्या बाहेर नेण्यात आल्या आणि महाराष्ट्रात पुन्हा एक वादळ येण्यापासून टळले.