Fadnavis, Pawar lost their right to remain in power : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली राजीनाम्याची मागणी
Mumbai : स्व. संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेकऱ्यांनी जी क्रूरता केली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. असे असतानाही सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत होते. सरकारच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री अजित पवार DCM Ajit Pawar यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
बीडच्या घटनेचे फोटो पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. काल या घटनेची छायाचित्रे पाहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करत आहे. पोलीस आणि सरकारकडे ही छायाचित्रे आणि व्हिडीओ आहेत. त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याने विषय संपत नाही. फडणवीस, सपकाळ यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे.
Harshawardhan Sapkal : काँग्रेसच्या दबावामुळे माधवी पुरी बूचविरोधात गुन्हा!
फक्त धनंजय मुंडेच्या राजीनामा घेतला म्हणून सरकार आपली पाठ थोपटून घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ का केले नाही हा खरा प्रश्न आहे. या अमानवी कृत्यांचे सगळे फोटो, व्हिडीओ, पुरावे सुरुवातीपासून पोलिसांकडे होते. या सैतानांच्या टोळीची अमानवी कृत्यांची संपूर्ण माहिती होती. असे असतानाही दोन महिने सरकार धनजंय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे या टोळीला सरकारचा पाठिंबा होता आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबायचे होते हे स्पष्ट होते, असा आरोपही सपकाळांनी केला.
Harshawardhan Sapkal : महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागली !
कातडी वाचविण्यासाठी मुंडेंचा राजीनामा
देशमुख कुटुंबियांच्या लढ्याला जनता आणि माध्यमांनी साथ दिली. त्यामुळे या प्रकरणातील सत्य उजेडात आले. अन्यथा हे प्रकरण दडपण्यात सरकार यशस्वी झाले असते. आता आपली कातडी वाचविण्यासाठी, मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती. अशा बातम्या पसरवून अंग झटकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून सुरु आहे. हा त्यांचा कातडी बचाव प्रयोग यशस्वी होणार नाही. त्यांचे सत्य जनतेसमोर आले आहे. त्यामुळे त्यांनी पायऊतार व्हावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.