Breaking

Akash Fundkar : वडिलांच्या कर्मभूमीचे नेतृत्व आता मुलाकडे

Appointment of Akash Fundkar as the new guardian minister of Akola: अकोल्याचे नवे पालकमंत्री म्हणून आकाश फुंडकर यांची नियुक्ती

Akola जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आकाश फुंडकर हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सध्या ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील भाऊसाहेब फुंडकर यांनी यापूर्वी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार सांभाळला आहे. त्यांचे वडील अकोल्याचे खासदारही राहिले आहेत. वडिलांच्या कर्मभूमीत आता आकाश यांच्या नेतृत्वात विकासाची गंगा येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

आकाश फुंडकर यांचे वडील, स्व. भाऊसाहेब फुंडकर, हे राज्याचे कृषिमंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. आता वडिलांच्या कर्मभूमीत आकाश फुंडकर यांना पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी अकोला जिल्ह्यातील एका सत्कार समारंभात त्यांनी, ‘वडिलांच्या कर्मभूमीत काम करण्याची संधी मिळाल्यास आनंदाने स्वीकारेन. ती माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असेल,’ असे उद्गार काढले होते.

Girish Mahajan : ‘स्वामित्व’ योजनेद्वारे अर्थव्यवस्था बळकट होणार !

आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्याच्या विकासाला गती घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांच्यासमोर अनेक आव्हानेही आहेत. अकोला जिल्ह्यातील रखडलेला विकास पुन्हा मार्गावर आणणे हे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान असेल. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना गती देणे. विशेषतः विमानतळ विकास, रस्ते सुधारणा, कृषी सिंचन प्रकल्प आणि प्रशासकीय कार्यालयांच्या इमारतींचे प्रश्न मार्गी लावणे यावर त्यांना लक्ष केंद्रीत करावे लागेल.

अकोला जिल्ह्यातील रस्ते विकास हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्हा रस्ते विकासाच्या बाबतीत मागे आहे. याशिवाय, नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाच्या प्रलंबित कामांना गती देणे. तसेच आरोग्यसेवेशी संबंधित समस्या सोडवणे. या बाबींवरही त्यांना विशेष लक्ष द्यावे लागेल.

Eknath Shinde : ‘स्वामित्व’ सरकारी योजना नव्हे, तर ग्रामविकासाची चळवळ !

फुंडकर यांची नियुक्ती जिल्ह्यासाठी नवी दिशा
आकाश फुंडकर यांची नियुक्ती जिल्ह्यासाठी नवी दिशा ठरेल, असा विश्वास जनतेमध्ये आहे. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वातून अकोला जिल्ह्याचा विकास गतीने पुढे जाईल, अशी आशा व्यक्त होत आहे.