Half of the Gram Panchayats will gate female Sarpanchs : १२ तालुक्यांत ३६३ ठिकाणी महिलाराज; सोडत लवकरच
Amravati जिल्ह्यातील ७२५ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये ३६३ पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, अनुसूचित जाती (७७), अनुसूचित जमाती (३२), नागरिकांचा मागास प्रवर्ग (९८), आणि सर्वसाधारण प्रवर्गात (१५६) महिला सरपंच असतील.
याशिवाय, चिखलदरा व मेळघाट तालुक्यातील सर्व सरपंच पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. मात्र, या भागातील महिला सरपंच पदांसाठी अद्याप सोडत होणे बाकी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आणि समर्पित आयोगाच्या निकषांनुसार ७२५ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
Amravati District : ७२२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण बदलणार !
जिल्हा निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, सन २०३० पर्यंत हे आरक्षण कायम राहील. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने अधिसूचना जारी केली आहे. ५० टक्के सरपंचपदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या मेळघाटमधील काही ग्रामपंचायती वगळण्यात आल्या आहेत.
Amravati District : ६३ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ
थेट सरपंच पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण (मार्च २०३० पर्यंत)
अनुसूचित जाती: १५४ पदे (७७ महिलांसाठी)
अनुसूचित जमाती: ६४ पदे (३२ महिलांसाठी)
नागरिकांचा मागास प्रवर्ग: ६१९५ पदे (३१०५ महिलांसाठी)
सर्वसाधारण प्रवर्ग: ३११ पदे (१५६ महिलांसाठी)
एकूण: ७२५ थेट सरपंच पदे (३६३ महिलांसाठी)
ग्रामपंचायतींमध्ये महिलांचा सहभाग वाढावा आणि प्रशासनातील स्त्री नेतृत्व बळकट व्हावे. यासाठी सरकारने हे धोरण राबवले आहे. तालुकानिहाय सोडतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.