Chandrashekhar Bawankule’s orders, Juni Kamathi police alert and a large gang caught : गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरू
Nagpur : बकरी ईद उद्या शनिवारी ७ जून रोजी आहे. या पृष्टभूमीवर गोवंशाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केल्या. त्यांनी या तक्रारींची तात्काळ दखल घेत गोवंश तस्करांना जेरबंद करण्याचे आदेश दिले. पालकमंत्र्यांचे आदेश मिळताच पोलिस अॅक्शन मोडवर आले अन् गोवंश तस्करांची मोठी टोळी गजाआड केली.
नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी भागात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत २३८ गोवंशीय प्राण्यांची सुटका करण्यात आली. सुमारे २४ लाखांच्या मुद्देमालासह या टोळीला पोलिसांनी अटक केली. जुनी कामठी परिसरात ही कारवाई केल्यानंतर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर ही कारवाई अद्यापही सुरूच आहे.
DCM Shindeagainst UBT : एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील
बकरी ईदच्या पृष्ठभूमीवर गोवंश हत्या होऊ नये, यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पोलिस अलर्ट मोडवर होते. काल (ता. ५ जून) रात्री माहितीच्या आधारावर पोलिसांनी जुनी कामठी परिसरात एका गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी २३८ गोवंश तेथे मरणासन्न अवस्थेत आढळले.
Ladki Bahin : राज्यात विविध विभागाचे निधी वळवण्याचे सत्र सुरूच
पोलिसांनी या सर्व गोवंशांची सुटका केली. या प्राण्यांची एकूण किंमत २३ लाख ८० हजार रुपये सांगण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोडाऊन मालक आणि घर मालक नब्बू वजीर कुरेशी, साजिद कुतुब कुरेशी, जुबेर अल्ताब कुरेशी, फैय्याज सत्तार कुरेशी, आसिफ कुरेशी आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर लोकांवर गोवंशीय प्राण्यांची अवैध कत्तल करण्याच्या आरोपाखाली विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.