Breaking

Buldhana RTO : आरटीओ कार्यालयाचा कारभार ढेपाळला

Transport Department office is functioning without a chief officer : कर्मचाऱ्यांची बदली, नवीन कर्मचारी दिलेच नाही

Buldhana बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सध्या कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. एकीकडे ट्रान्सपोर्ट विभाग प्रमुख अधिकाऱ्याविना ओस पडला आहे, तर दुसरीकडे रस्त्यांवर सामान्य वाहनधारकांवर कारवाईचा जोर वाढला आहे.

महत्त्वाच्या परवानग्या, वाहन हस्तांतरण यांसारख्या कामांसाठी दररोज आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तासंतास ताटकळावे लागत आहे. प्रभारी अधिकारी अनुपस्थित असून, “साहेब बाहेर गेलेत” अशी ठरलेली उत्तरं देण्यात येत आहेत. परिणामी नागरिकांचा वेळ, पैसा आणि संयम तिघांचाही चुराडा होत आहे.

Collector of Buldhana : भूमीहक्क, कर्जमुक्ती व सामाजिक न्यायासाठी बहुजनांचा हल्लाबोल!

महामार्गांवरून दररोज धावणारी ओव्हरलोड वाहने, रेती वाहतूक करणारे टिप्पर, विना नंबर प्लेटची वाहने याकडे दुर्लक्ष केले जात असतानाच, लहान वाहनधारकांवर – जसे की रिक्षा, अॅपे, छोटा हत्ती, दुचाकीस्वार – यांच्यावर दंडात्मक कारवाया सुरू आहेत. एका महिला अधिकाऱ्याने दोन महिन्यांपासून बंद असलेल्या गाड्यांवरही चार दिवसांत दोनवेळा कारवाई केल्याचा आरोप वाहनचालकांकडून करण्यात आला आहे.

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत

खामगाव येथे नव्याने सुरू झालेल्या आरटीओ कार्यालयासाठी बुलढाण्यातील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली झाली. मात्र, त्यांच्या जागी नवीन नियुक्त्या न झाल्याने बुलढाणा कार्यालयात कर्मचाऱ्यांची उणीव भासते आहे. त्यामुळे सर्व कामांचा भार मोजक्याच कर्मचाऱ्यांवर असून, सेवा-delivery मंदावली आहे.

Vidarbha farmers : अनुदानित बियाणांना हजारो शेतकरी मुकणार!

एकंदरीत, बुलढाणा आरटीओ कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवत असून, त्याचा फटका सामान्य जनतेला बसतो आहे. शासनाचाही महसूल बुडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गोंधळावर परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लक्ष दिले जाईल का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.