Breaking

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंची प्रशासनावरील पकड ठरेल फायद्याची ?

Bawankule’s grip on administration will be beneficial : नागपूरसह अमरावतीचेही पालकत्व आले वाट्याला

Nagpur राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली. नागपूरकर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रिपद स्वीकारले. तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवीत नागपूरचे पालकत्व सोपविले. सोबतच त्यांच्याकडे अमरावतीच्या पालकमंत्रिपदाचीही दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे.

बावनकुळे यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत नागपूरचे पालकमंत्री असताना धडाकेबाज कामगिरी केली होती. आता त्यांची दुसरी टर्म कशी असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. फडणवीस, बावनकुळे व जयस्वाल यांच्या रूपात नागपूर जिल्ह्याच्या वाट्याला तीन पालकमंत्रिपदे आली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच ते गडचिरोलीचे पालकत्व घेण्यासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले होते. त्याचवेळी नागपूरची जबाबदारी बावनकुळे यांच्याकडे येईल, हे स्पष्ट झाले होते.

Sudhir Mungantiwar : पर्यावरणाचा गोवर्धन उचलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता !

सोबतच अमरावतीची जबाबदारीही बावनकुळे यांच्याकडे सोपवून विदर्भातील सर्वांत महत्त्वाच्या दोन्ही प्रशासकीय जिल्ह्यांचा कारभार मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासू व्यक्तीकडे सोपविला आहे. बावनकुळे यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये नागपूरसह तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली होती. बावनकुळे यांची प्रशासन सांभाळण्याची हातोटी विलक्षण आहे.

त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेतील सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तीन वेळा ते विधानसभेचे आमदार आहेत. मधली दोन वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते. भारतीय जनता पक्षाच्या पक्षीय विस्तारात बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बावनकुळे यांची प्रशासनावर पकड आहे. शुक्रवारी त्यांनी नागपूर जिल्हा परिषद व नागपूर महापालिकेचा आढावा घेतला. या बैठकीत त्याची झलक पाहायला मिळाली.

Babasaheb Patil : लातुरचा नेता गोंदियाचा पालकमंत्री!

बावनकुळे यांचा विविध विषयांचा अभ्यास पक्का असल्यामुळे अधिकाऱ्यांनाही त्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना दहावेळा विचार करावा लागतो. पालकमंत्री म्हणून नागपूर जिल्ह्यात रोजगार आणि उद्योग, तसेच पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल. उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून उद्योगांना चालना देऊ. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या कृषी कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करून शेतकरी व तरुणांना ताकद देऊ. तसेच महसूल व्यवस्था मजबूत करण्यासाठी तालुकानिहाय भेटी देऊ, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.