Chief Minister’s Green Signal to NMRDA’s Mega Budget : आऊटर नागपूरच्या विकासाचा मार्ग खुला
Nagpur शहराचा चौफेर विकास होत आहे. त्याचवेळी आऊटर नागपूरच्या विकासासाठी भरीव तरतूद महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०२५-२६ या वर्षाचा दोन हजार ५७७ कोटी २८ लाखांच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Green signal दिले आहे. त्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत या बजेटला मान्यता देण्यात आली आहे.
आता शहराच्या सीमेवरील भागांतील विकासाचा वेग वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाला मान्यता दिली. यात नागपूर शहरालगतच्या २५ गावांच्या सीवेज प्रकल्पासाठी २०० कोटी, १३ गावांना पाणीपुरवठा, रस्ते व पुलासाठी २०० कोटी, प्रधानमंत्री आवासकरिता १२० कोटी, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी तीर्थक्षेत्र विकासासाठी १७७ कोटी, दीक्षाभूमीसाठी ८० कोटी, ताजबाग विकासासाठी १२.५५ कोटी, परमात्मा एक सेवक विकास आराखडा, पावनदोडासाठी ५० कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्र्यांच्या कारवाईचा ‘इफेक्ट’!
एनएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मीणा यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. सुरुवातीच्या शिलकीसह सादर केलेल्या २५७७.२८ कोटींच्या अर्थसंकल्पात प्रकल्प (शासकीय) निधी १३३४.९३ कोटी रुपये, विकासनिधी ६६६.०२ कोटी व अग्रीम व करठेवी ७२.९३ कोटी, असे एकूण २०७३.८८ कोटी रुपयांच्या खर्चाचे प्रावधान करण्यात आलेले आहे. एनएमआडीए हद्दीतील क्षेत्र विकास योजनेतील जागेच्या फेरबदलाच्या प्रस्तावामध्ये २.० हे.आर.पर्यंतच्या जागेबाबत ठराव घेण्याचे व प्रस्ताव शासनास सादर करण्याचे तसेच कार्यवाहीचे अधिकार महानगर आयुक्त यांना देण्यात आले.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांना अख्खं राज्य हवय cataract free !
केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान २.० योजनेंतर्गत एनएमआडीए क्षेत्रातील २५ गावांत दक्षिण व पूर्व मलनिस्सारण (सीवरेज) प्रकल्प राबविला जाणार आहे. या कामाचे कार्यादेश देण्यात आले. तसेच केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० योजनेंतर्गत एनएमआडीए क्षेत्रातील प्रस्तावित १३ गावांना पाणी पुरविण्याचे प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. यात बेसा, बेलतरोडी, पिपळा, घोघली, हुडकेश्वर (खुर्द), शंकरपूर, गोळापांजरी, वेळाहरी, रूई, वरोडा, पांजरी (फार्म), किरणापूर, कन्हाळगाव या गावांचा समावेश आहे. या गावातील लोकांना स्वच्छ पाणी मिळणार आहे.