Malpractice in loan allocation in Amravati District Bank :
Amravati शिक्षक बँकेतील पदभरती घोटाळा नंतर आता अमरावती जिल्हा महिला सहकारी बँकेतही कर्ज वाटपात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. अमरावतीद्वारा संचालित अचलपूर शाखेत खोटे दस्तावेज सादर करून बँकेशी कुठलाही संबंध नसताना, अचलपूर-परतवाडा शहरातील बेरोजगार युवक, व्यावसायिक व शिक्षकांच्या नावे लाखो रूपयांचे कर्ज परस्पर उचलल्या गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी अनेकांनी अचलपूर शाखेत धाव घेत पोलिसांतही तक्रार नोंदविली आहे. याबाबत पोलिस प्रशासन व जिल्हा महिला सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आर्थिक गैरव्यवहाराबाबत दुजोरा दिला आहे.
बँकेतून कर्ज वाटप करत असताना ज्यांच्या नावे कर्ज वितरीत करण्यात आले, ती व्यक्ती बँकेत रक्कम काढण्यासाठी आलीच नाही. अनेकांना तर आपल्या नावे कर्ज उचल केल्याची माहिती बँकेतून फोन व नोटीस प्राप्त झाल्यानंतर झाली आहे. काही बेरोजगार युवकांचे दस्तावेज घेऊन कर्ज मिळवून देत असल्याचे सांगत कर्ज प्रकरण मंजूर प्रक्रियेसाठी जमानतदारांच्या जोडलेल्या दस्तावेजांचा वापर करुन जमानतदारांच्या नावावरही कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे ज्यांनी कर्जासाठी दस्तावेज दिले, त्यांचे कर्ज मंजूर करत त्या व्यक्तीला न सांगला लाखांची रक्कम परस्पर काढल्याचा प्रकारही पुढे आला आहे. सिव्हिल लाईन निवासी रघुनंदन ऊर्फ बाल्या उपाध्याय यांनी जिल्हा महिला सहकारी बँकेतून कर्ज मिळून देतो. असे सांगून आधारकार्ड, पॅनकार्ड, तीन वर्षाचे आयकर रिटर्न, विद्युत बिल व चेक असे दस्तावेज जमा करून कर्ज मिळवून देत असल्याचे तक्रारदात्यानी सांगितले.
Ashish Shelar on Sharad Pawar : शरद पवार हे विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक !
कर्ज वितरीत करताना दोन लक्ष रुपयांचे कर्ज मंजूर करून हातात १ लाख ७० हजार दिल्या जाईल. उर्वरित रक्कम कमीशन स्वरुपात खर्च होईल. दिली. तसेच दरमहा ५ हजार रुपये बँकेत भरावे लागतील, असे सांगूनहा प्रकार करण्यात आला. अख्खी रक्कम परस्पर खात्यातून काढण्यात आली.
शिक्षक असल्याचे खोटे दस्तावेज
शहरातील जवळपास २५ ते ३० जणांच्या नावावर हे कर्ज मंजूर करून घेतले. ते शाळेतील शिक्षक म्हणून शासकीय नोकरीवर असल्याचे खोटे दस्तावेज जोडण्यात आले. हा सर्व प्रकार उपाध्याय यांच्या माध्यमातून बँकेच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने करण्यात आल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.