MNS allegation of giving birth certificate for 15 thousand rupees : १५ हजार रुपयांत कागदपत्र दिल्याचा दावा
Amravati तहसील कार्यालयांतर्गत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता प्रत्येकी १५ हजार रुपयांत जन्मदाखले दिल्याचा गंभीर आरोप मनसेचे शहराध्यक्ष धीरज तायडे यांनी केला आहे. मंगळवारी त्यांनी शासनाकडे निवेदन सादर करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. महसूल प्रशासनाकडून याबाबत सारवासारव केली जात असली, तरी संबंधित नायब तहसीलदार चर्चेत आले आहेत.
अमरावती तहसील कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या प्राधिकृत तहसीलदारां मार्फत जन्मदाखले दिले जातात. मात्र, या प्रकरणात नायब तहसीलदारांनी दाखले दिल्याने अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. तहसीलदार प्राधिकृत असतानाही नायब तहसीलदारांनी हे दाखले कसे आणि कोणाच्या आदेशाने दिले? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Akola Crime Branch : आंतरराज्यीय ऑनलाइन सट्टेबाजीच्या रॅकेटचा पर्दाफाश
मनसेच्या आरोपानुसार, दलालांच्या मदतीने प्रत्येकी १५ हजार रुपये घेऊन फक्त आधार कार्ड व वृत्तपत्रातील जाहीरनाम्यावर आधारित काही बांगलादेशी नागरिकांना जन्मदाखले दिले गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, बहुतांश प्रकरणांमध्ये टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) उपलब्ध नाही. ज्या प्रकरणांत टीसी जोडली आहे, त्यावर खोडतोड आढळून आली आहे. तलाठी, मंडळ अधिकारी किंवा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा घरचौकशी अहवालही नसल्याचे उघड झाले आहे.
याशिवाय, काही प्रकरणांत आधार कार्ड व टीसी अन्य जिल्ह्यांतील असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चुकीच्या व्यक्तींना जन्म व मृत्यू दाखले देण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
Forest Department : वाघ, बिबट्याच्या २२ मिश्या, खवले मांजराचे दात जप्त !
या संदर्भात एसडीओ तथा आरडीसी अनिल भटकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “कार्यकारी दंडाधिकारी असल्याने नायब तहसीलदारांकडून स्वाक्षरी करून दाखले जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तपासात गैरव्यवहार आढळल्यास दोषींवर कारवाई निश्चित करण्यात येईल.”