The politics of Amravati heated Illegal residence of Bangladeshis and Rohingyas : प्रशासन जागे; तपासणीसाठी समितीची स्थापना
Bangladeshis in Amravati जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी येथील तहसीलदारांनी सुमारे ११०० बांगलादेशी, रोहिंग्या मुस्लिमांना खोट्या पुराव्यावरून जन्मदाखले दिले. यासंदर्भातील तक्रार माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सोमय्यांच्या या तक्रारीनंतर अमरावती जिल्ह्यातील राजकारण चांगले तापले आहे. त्यामुळे आता प्रशासनही जागे झाले आहे. आता तपासणीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या बांगलादेशी आणि रोहिंगे वास्तव्याला आहेत. त्यांना खोट्या प्रमाणपत्रावर दाखले दिल्या जात असल्याची तक्रार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तक्रारीतील मुद्द्यांची शहानिशा करण्यासाठी दर्यापूरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी डॉ. रवींद्र कानडजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. पोलिसही स्वतंत्ररीत्या तपास करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का!
या समितीत अंजनगाव सूर्जीचे पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, अंजनगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर व तेथीलच गटविकास अधिकारी श्रीकिसन खताळे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. गेल्या सहा महिन्यांत अंजनगाव सूर्जी तहसील प्रशासनाने दिलेल्या जन्मदाखल्यांची, त्यासोबत जोडलेल्या दस्तऐवजांची तपासणी ही चार सदस्यीय समिती करेल. त्यासाठी त्यांना सात दिवसांचा कालावधी दिल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Amravati Municipal Corporation : काँग्रेस आक्रमक, अमरावती महापालिका धडकला मोर्चा
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर समिती गठीत करण्यात आली. साधारणत: दीड वर्षापूर्वी वर्षभरापूर्वी जन्मलेल्यांचे जन्मदाखले वितरणाची जबाबदारी तहसीलकडे आली. आजही प्रत्येक तहसीलमध्ये चार ते पाच हजार अर्ज आहेत. अंजनगाव सूर्जी तहसीलनेदेखील विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करत जन्मदाखले दिले आहेत. त्यामुळे चौकशीचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.