Breaking

Indian Railway : लोकोपायलट म्हणतात, ‘आमच्या कामाते तास कमी करा’ : लोकोपायलट म्हणतात, ‘आमच्या कामाते तास कमी करा’

 

‘Reduce our working hours’, say loco pilots : उपोषणातून मांडली व्यथा; वेळापत्रक बदलण्याची मागणी

Gondia रेल्वे लोकोपायलटच्या कामाचे तास कमी करण्यात यावे. नाईट शिफ्टमध्ये बदल करण्यात यावे आणि दैनिक कामाचे वेळापत्रकही बदलावले, यासह विविध मागण्यांसाठी लोकोपायलटनी ३६ तासांचे उपोषण केले. रेल्वे मंत्रालयाच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदविला.

देशभरातील लोको पायलटने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या विरोधात ३६ तास उपोषण करण्याचा निर्णय घेतला. याच अंतर्गत गोंदिया रेल्वे स्थानकावर हे आंदोलन करण्यात आले. ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनने All India Loco Running Staff Association एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी मागण्यांचा समावेश केला आहे.

Eknath Shinde : Facebook Live करणाऱ्यांना आम्ही घरी बसवले

या पत्रकातून सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांची कामाची वेळ आठ तासांची करण्यात यावी. नाईट शिफ्ट बंद करुन ती दोन दिवसात विभागून देण्यात यावी. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना १६ तास दैनिक विश्रांती शिवाय ३० तासांची साप्ताहिक विश्रांती घेण्यास मंजुरी देण्यात यावी. लोकापायलट यांना ३६ तासांपूर्वी घरी जाण्याची सुटी द्यावी, या मागण्यांचा समावेश आहे.

याशिवाय लोको पायलटचा माइलेज भत्ता वाढविण्यात यावा, लोको पायलटच्या माइलेज भत्त्यात ७० टक्के प्रवास भत्ता देण्यात यावा, रेल्वे बोर्डच्या माध्यमातून रिक्त असलेल्या २२ हजार लोको पायलटच्या जागा भरण्यात याव्यात. जुलै २०२४ मध्ये गठीत करण्यात आलेल्या दोन उच्चस्तरीय समितीचे अहवाल सादर करण्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन
करण्यात आले.

United Forum of Bank Unions : बँक कर्मचाऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार!

मालगाडी लोको पायलट एच.के.ओझा, विनय मेश्राम, रिंकु गवली, पँसेजर गाडीचे लोको पायलट बी.एम.साहू, सी.एस.पराते, विनोद सहारे, वी.एस.आनंदपवार, पी.एस.गजभिये, मेल गाड्यांचे लोको पायलट हरेकृष्णा, बी.राहुल, मिथुन राऊत, मोनू पवार, जितेंद्र चौकसे, राहुल सनोदिया, सत्येंद्र कुमार, सोहनलाल, सुधीर बावनकर, राम कनौजी, विशाल सोनुले, हरिशंकर नायर, आशीष सेन व रवीदा झगेकर यांचा उपोषणात समावेश होता.