Names of 22,000 women excluded from Ladki Bahin scheme : निवडणुकीपूर्वी मिळाला लाभ; आता निकषांवर काटेकोर अंमलबजावणी
Amravati मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या फेरतपासणीत अमरावती जिल्ह्यातील २२,०६७ महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणी एका क्षणात नावडत्या झाल्या आहेत, अशी चर्चा होऊ लागली आहे. या महिलांना यापुढे फेब्रुवारी २०२५ पासून अनुदान मिळणार नाही. मात्र, यापूर्वी मिळालेली रक्कम परत मागितली जाणार नाही, हे विशेष.
जिल्ह्यात ७.२० लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६.९८ लाख पात्र ठरल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या संख्येने महिलांना लाभ देण्यात आला होता. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर निकषांची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली. परिणामी, ऑनलाइन अर्ज भरून पात्र ठरलेल्या परंतु निकषात न बसणाऱ्या अर्जदारांचे अर्ज आता रद्द करण्यात आले आहेत.
Governor C P Radhakrishnan : विद्यापीठ, प्राध्यापकांनी आता बदल स्वीकारावे
जिल्ह्यातील ३५ महिलांनी स्वयंप्रेरणेने योजनेतून माघार घेत लाभ नाकारला आहे. त्यांनी महिला व बालविकास अधिकाऱ्यांना लेखी पत्र सादर केले आहे. त्यामुळे या योजना लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी घट झाली आहे. निकषांच्या अंमलबजावणीमुळे अपात्र ठरलेल्या महिलांवर कारवाई होईल का? असा प्रश्न निर्माण झाला होता. काहींनी भयामुळेच योजना सोडण्याचा निर्णय घेतला, असे बोलले जात आहे.
Abu Azmi controversy : ठाकरे गट, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
पूर्वी १५०० रुपये अनुदान मिळणाऱ्या महिलांसाठी महायुती सरकारने २१०० रुपयांचा लाभ जाहीर केला होता. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा लाभ मिळण्यास विलंब का होत आहे, याबाबत महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे. त्यामुळे हा केवळ निवडणुकीचा गाजर नव्हता ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.