Breaking

Liquor duty hike : गरिबांची देशी पोचली 80 वर, मद्यप्रेमींची चिंता वाढणार

Liquor duty hike, Rs 14,000 crores will be added to the treasury : मद्याची शुल्क वाढ, तिजोरीत 14 हजार कोटींची भर पडणार !

Mumbai: देशात बिअर व आयात मद्याचे दर कमी होणार असे वृत्त काही दिवसापूर्वी आले आणि मद्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला. पण, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दारु विक्रीवर कर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, तिजोरीत 14 हजार कोटींची भर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे आम पब्लिक आणि गरिबांची देशी 80 त्यावर गेली असून इतर मद्य पण महाग होणार असल्यामुळे मद्यप्रेमींची चिंता वाढणार आहे.

राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दिड टक्याने कर वाढविण्यात आला आहे. त्यासह, विदेशी मद्यावरही हा कर वाढविण्यात आल्याने आता मद्यप्रेमींसाठी हा निर्णय खिशाला झळ देणारा ठरणार आहे. उत्पादन शुल्क विभाग राज्य सरकारचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोनातून, मद्यविक्रीवर कर वाढविण्याचा विचार करत होते.

Ajit Pawar NCP : २५ हजार कार्यकर्ते राष्ट्रवादीत करणार प्रवेश

त्या नुसार भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दिड टक्याने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार कोटींचा महसूल वाढणार आहे. असे सांगण्यात येत आहे या नव्या करवाढी मुळे १८० मिली मद्य किरकोळ विक्रीची साधारण किंमत अशी राहू शकते यात देशी मद्य 80 रुपये. महाराष्ट्र मेड लिकर १४८ रुपये, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य २०५ रुपये, विदेशी मद्याचे प्रमीयम ब्रॅण्ड ३६० रुपये,
यासोबतच राज्य सरकारने आता सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता दिली आहे. यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आता यातून आणखी महसूल वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

  • सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)

    २७ वर्षांपासून विविध राज्यस्तरीय दैनिकांमध्ये रिपोर्टरपासून कार्यकारी संपादक पर्यंतचा विस्तृत अनुभव. डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात ही यशस्वी योगदान.