Akola Congress goes into active mode as soon as local body elections appears in front : शिष्टमंडळ अकोला जिल्हाधिकाऱ्यांना भेटले
Akola : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. काही राजकीय नेत्यांनी दिलेल्या संकेतानुसार येत्या ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका व्हायला हव्या. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागल्याचे चित्र आहे. अकोला जिल्ह्यात काँग्रेसही निवडणुकीच्या अनुषंगाने अॅक्टीव मोडवर आल्याचे पहायला मिळाले.
अकोला जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये २७ मे रोजी मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. काँग्रेस पक्षाचे एक शिष्टमंडळ अकोला जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच भेटले आणि निवेदन दिले. त्या निवेदनात सदर मागणी करण्यात आली.
Maha politics : महायुतीत ‘राजी’ ‘नाराजी’ नाट्याचे रोज नवे प्रयोग !
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यातील ज्वारी, कांदा, मक्का, मूग, भूईमुग, तीळ, पपई, संत्रा, केळी व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये मुख्यत्वे उभ्या पिकांमध्ये नुकसान आहे. काही शेतकऱ्यांनी शेतात काढणी करून गंजी उभी केली आहे. त्या पिकांचेसुद्धा अतोनात नुकसान झाले. परंतु शेतात काढणी करून गंजी केलेल्या पिकांचे सर्वेक्षण संबंधित कर्मचारी करत नसल्याच्या तक्रारी आहेत.
अकोला जिल्ह्यात जवळपास २०० गावांमध्ये आठ ते १० हजार एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी पिकांची विक्री करून उन्हाळी पिके पेरले होते. या पिकांच्या विक्रीच्या पैशावर पुढील खरीप पिकाची लागवड अवलंबून आहे. तेव्हा सर्वेक्षणाचे काम त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना त्वरित रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
The glory of a retired officer : अमरावती विद्यापीठात ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ !
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, डॉ. सुभाष कोरपे, निखिलेश दिवेकर, अॅड. महेश गणगणे, अतुल अमानकर, पद्माकर वासनीक, तस्वर पटेल, मो राजाऊल हक, कल्पूभाई, भीमराव आनंद खंडारे, अनिस इकबाल, मासूम खान, डॉ. शाम हरिभाऊ नेमाडे, रवींद्र लांडे, डॉ. मो. फैय्याज हुसेन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.