Jaljivan mission needs oxygen in Nagpur district : मार्च २०२५ पर्यंत योजना पूर्ण होण्याची शक्यता कमीच
Nagpur जिल्हा परिषदेकडून जलजीवन मिशनमधून नागपूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याची कामे हाती घेण्यात आली. मात्र, शासनाची महत्त्वाकांक्षी योजना सहा महिन्यांपासून आर्थिक दुष्टचक्रात अडकली आहे. आर्थिक दुष्टचक्रामुळे जलजीवन व्हेंटिलेटरवर असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १३०२ गावांसाठी जलजीवनच्या योजनांची कामे घेतलेली आहेत. आतापर्यंत फक्त ५०१ गावांतील कामे पूर्ण झाली आहेत.
उर्वरित ८२१ कामे प्रलंबितच आहेत. योजना पूर्ण झालेल्या संबंधित गावांना मोठ्या प्रतीक्षेनंतर नळाद्वारे पाणी मिळाले आहे. अगोदरच निकृष्ट कामांचे आरोप झाल्याने अनेक कंत्राटदारांना नोटीस मिळाल्या. यात झालेल्या कामाची बिलेही अडकली. कंत्राटदारांची ६८ कोटींची बिले थकली आहे. वास्तविक मार्च २०२४ पर्यंत जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करावयाची होती. मात्र मुदतीत कामे न झाल्याने या योजनेला सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली. परंतु त्यानंतरही योजनेची गती वाढली नाही.
मुदतीत कामे पूर्ण न झाल्या या योजनेला पुन्हा मार्च २०२५ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ मिळाली परंतु मुदतीत कामे पूर्ण व्हावी, यासाठी शासनाकडून निधी मिळत नाही. त्यामुळे कंत्राटदारही अडचणीत आहेत. कंत्राटदारांची थकबाकी ५८ कोटींवर गेली. त्यासाठी जिल्हा परिषदेतून शासनाकडे निधीची मागणीही करण्यात आलेली आहे. मात्र गेल्या चार महिन्यांपासून एक रुपयाही आलेला नाही.
Nagpur जिल्ह्यात १३०२ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यांपैकी ५०१ योजनांची कामे पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. परंतु त्यामधूनही प्रत्यक्ष ३४३ योजनांच प्रत्यक्षात ग्रामपंचायतींना हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. अर्थात त्यातून प्रत्यक्षात ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर ८२१ योजनांची कामे अजूनही रखडली आहेत. निधीच उपलब्ध होत नसल्याने ही कामे मार्चअखेर पूर्ण कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Question of abandoned bodies : वर्षभरात २५ मृतदेहांवर प्रशासनाकडून अंत्यसंस्कार!