Gadkari came down from the podium to praise the heroes : हृद्य सोहळ्याने सारेच भारावले; ‘आर्मड् फोर्सेस व्हेटरन्स डे’ सोहळ्यात सहभागी
Nagpur देशासाठी लढताना ज्यांनी प्राणांची आहुती दिली, अशा सैनिकांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. तसेच देशासाठी लढून विशेष पदक घेणारे सेवानिवृत्त सैनिक देखील उपस्थित होते. यातील काही वयोवृद्ध सैनिक तसेच वयोवृद्ध वीर माता व वीर पीता यांचा सत्कार करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्यासपीठावरून खाली उतरले. ते स्वतः त्यांच्यापर्यंत गेले आणि त्यांचा सत्कार केला. हे दृष्य बघून सोहळ्याला उपस्थित सारेच भारावले होते.
सशस्त्र सेनेतील शहीदांप्रती तसेच सेवानिवृत्त सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला. ‘आर्मड् फोर्सेस व्हेटरन्स डे’चे यंदा ९वे वर्ष होते. वायूसेनानगर येथील एअरफोर्स कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एअर मार्शल विजयकुमार गर्ग, व्हाइस अॅडमिरल किशोर ठाकरे, एअर मार्शल देव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Sudhir Mungantiwar : चंद्रपुरातून सुरू होणारी ‘क्लायमॅट चेंज’ चळवळ देशव्यापी व्हावी !
गडकरी म्हणाले, ‘आपल्या सैनिकांनी बलिदान दिले म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत. त्यांच्या परिश्रमाने, त्यांच्या रक्ताच्या थेंबांनी देशाचा इतिहास लिहिला गेला आहे. त्यामुळे देशाच्या गौरवशाली इतिहासात सैनिकांच्या बलिदानाचे महत्त्व मोठे आहे. त्यांना कधीही विसरता येणार नाही.’ यावेळी शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा तसेच सेवानिवृत्त सैनिकांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘आपल्या देशासाठी सैनिकांनी खूप मोठे बलिदान दिले आहे. देशाचे रक्षण करताना अनेकांचे प्राण गेले. तर अनेक जण आपले कर्तव्य बजावल्यानंतर सेवानिवृत्त झाले आहेत. वीरांची परंपरा हा आपल्यासाठी कायम अभिमानाचा विषय राहिला आहे,’ असं ते म्हणाले.
आपल्या देशाचे सैनिक युद्धामध्ये बलिदान देतात. त्यामुळे आपण इथे सुरक्षित आहोत. ते कुठल्या परिस्थितीत देशाचे रक्षण करतात हे मी स्वतः अनुभवले आहे. काश्मीरमध्ये मायनस चार डिग्री तापमानात आपले सैनिक सीमेवर रक्षण करत असतात, हे मी बघितले आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.