Pilgrimage from Chandrashekhar Bawankule to Ladki Bahin : अयोध्येची घडवत आहेत वारी
महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. एकीकडे महाकुंभची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना बावनकुळे यांनी महिलांसाठी अयोध्येतील राममंदिर दर्शनासाठी तीर्थदर्शन यात्रा सुरू केली आहे. विशेष म्हणजे यात गरीब कुटुंबातील महिलांना नि:शुल्क अयोध्येला जाण्याची संधी मिळणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा योजनेंतर्गत 54 महिला यात्रेकरू नववर्षाच्या पहिल्या दिवशी वातानुकूलित बसद्वारे अयोध्येला तीर्थदर्शनासाठी रवाना झाल्या. कोराडी महालक्ष्मी मंदिरातून या यात्रेला सुरुवात झाली. कोराडी महालक्ष्मी संस्थानच्या वतीने आयोजित या तीर्थयात्रेचा शुभारंभ बावनकुळे chandrashekhar bawankule यांच्या हस्ते करण्यात आला. तीर्थयात्रेला गेलेल्या बहुतांश बहिणी या दररोज रोजीवर कामाला जाणाऱ्या आहेत.
कोराडी ते अयोध्या..
आर्थिक परिस्थितीमुळे आजवर पूर्ण न होणारे कष्टकरी महिलांचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण होणार आहे. केंद्र सरकार व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वसामान्यांना अधिकाधिक योजनांचा लाभ व्हावा, यादृष्टीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा ही अनेक गोरगरिबांना आपल्या इच्छांची पूर्ती करणारी यात्रा म्हणून महत्त्वाची आहे. यादृष्टीने विचार करून कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या वतीने महालक्ष्मी ते अयोध्या तीर्थयात्रेचा आज शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच यात्रेत आमच्या कष्टकरी लाडक्या बहिणींना अयोध्या येथील तीर्थदर्शनाचा लाभ होत असल्याचा मनस्वी आनंद असल्याची भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली.
24 Hrs Electricity for Farmers : शेतकऱ्यांनो आता भारनियमन विसरा; कृषीला 24 तास वीज
बावनकुळेच पालकमंत्री?
चंद्रशेखर बावनकुळेच नागपूरचे पालकमंत्री आहेत, असे विधान करून केंद्रीय मंत्री गडकरींनी पेपर फोडला आहे. अद्याप पालकमंत्र्यांची नावे घोषित झालेली नाहीत. पण गडकरींनी उल्लेख केल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखा घोषित केल्या. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात कार्यक्रम सुरू होता. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. गडकरी भाषण करत असताना बावनकुळेंचा उल्लेख त्यांच्या तोंडून पालकमंत्री असा झाला. त्यानंतर गडकरींना आपली चुक लक्षात आली. मात्र, त्यानंतर नागपूरचे पालकमंत्री बावनकुळेच होणार आहेत, असे सूतोवाच त्यांनी केले.