Breaking

Piyush Goyal : जनतेनेच केली राजधानी संकटमुक्त

Aam Admi made the capital tension-free : मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रमात सहभागी

Gondia सन २०४७पर्यंत विकसित देशाचे स्वप्न साकारण्यासाठी देशाची राजधानी आधी विकसित होण्याची गरज आहे. दिल्लीतील जनतेने भाजपाला दिलेल्या कौलामुळे हे स्वप्न आता साकार होणार आहे. भ्रष्टाचार, व्देषाचे राजकारण, पक्षपाती धोरण यापासून आता राजधानी खऱ्या अर्थाने संकटमुक्त झाली आहे. राजधानीत आता विकासाचे पर्व सुरू होईल, असे मत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले.

रविवारी (दि. ९) गोंदिया येथे मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल, जुबिलेंट लाइफ सायंसेसचे व्यवस्थापकीय संचालक हरी शंकर भारतिया, माजी खासदार नरेश गुजराल, उद्योजक मोहीत गुजराल, सीमा गोयल, वर्षा पटेल उपस्थित होते.

Mahayuti Government : उपेक्षित बालकांना ‘बालसंगोपन’चा आधार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पण, ही वाटचाल करीत असताना आणि विकसित भारताचे स्वप्न साकारताना आधी देशाच्या राजधानीचा विकास होणे गरजेचे आहे. दिल्लीतील जनतेने आता ही संधी भाजपला दिली असून, खऱ्या अर्थाने राजधानीचा चेहरा मोहरा बदलेल, असेही केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

जो लोकप्रतिनिधी जनतेत जाऊन काम करतो, विकास कार्य करतो तोच लोकांचे मन जिंकतो आणि जनतासुध्दा त्याला स्वीकारते. देशाच्या राजधानीत आणि देशात हेच झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास पर्वाचा जनतेने स्वीकार केला असून, जनतेची दिशाभूल करणाऱ्या आपला जनतेने त्यांची खरी जागा दाखवून दिली आहे. आता खऱ्या अर्थाने दिल्ली विकासाच्या दिशेने अग्रेसर होईल, असे सांगितले.

Crime in Wardha पतीने कानशिलात लगावली; संतप्त पत्नीची चिमुकलीसह आत्महत्या

आदिवासीबहुल व नक्षलप्रभावीत क्षेत्र म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख होती. पण, आता ही ओळख पूर्णपणे पुसली जात आहे. स्टिल सीटी आणि उद्योगनगरी या शहराची ओळख होत आहे. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे व्हिजन आणि राज्य सरकारच्या विकासात्मक धोरणामुळे शक्य होत असल्याचे सांगितले. तसेच २०२६ पर्यंत संपूर्ण देश नक्षलवादमुक्त हाेईल, अशी ग्वाही दिली.