Politics change, not for revenge says CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Nagpur Devendra Fadnavis हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छा दिला. विरोधकांनीही भेटणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. २०१९ ते २०२४ या काळात मात्र काहीसे संबंध बिघडले होते. मात्र बदल्याचे नाही तर बलल घडविण्याचे राजकारण करायचे आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
स्व. विलास फडणवीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहोळा आयोजित करण्यात आला. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक विवेक घळसासी यांनी मुख्यमंत्र्यांची यांची मुलाखत घेत त्यांना विविध मुद्द्यांवर बोलते केले. यंदाचा जिव्हाळा पुरस्कार कांचन फडके, ज्योती फडके यांना आणि ‘गायत्री बालिका आश्रम’ या संस्थेला देऊन गौरविण्यात आले. यावेळी विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, धरमपेठ महिला को. ऑप. सोसायटीच्या अध्यक्ष निलिमा बावणे आदी उपस्थित होते.
Farmers suicide : राजकीय अनास्थेमुळे रोज तीन शेतकऱ्यांचे बळी!
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. यामागे राजकारण नाही तर राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. याची जाणीव शरद पवार यांना झाल्याने त्यांनीही कौतुक केले. त्यांनीही संघाच्या नियोजनामुळे हा विजय शक्य झाल्याचे म्हटले, याचा फडणवीस यांनी आवर्जून उल्लेख केला.
पुढे जाऊन त्यांच्याशी जवळीक होणार का, यावर सावध भूमिका घेत ‘राजकारणात एखादी गोष्ट होणारच नाही, असे ठामपणे म्हणू शकत नाही’, असे उत्तर दिले. लोकसभेत फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात महाविकास आघाडीला यश आले. महायुतीसाठीही हा मोठा धक्का होता. त्यावेळी आम्हाला अतिआत्मविश्वास होता, अशी कुबुली दिली. विधानसभेत मात्र या फेक नॅरेटिव्हचा फुगा फोडला असल्याचे फडणवीस म्हणाले.
मुलगी राजकारणाचा वसा पुढे नेईल का?
मुलगी दिविजा पुढे राजकीय वारसा चालवेल का, या प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी माझ्या कुटुंबातून राजकारणात मी शेवटचा सदस्य असेल, असे स्पष्ट सांगितले. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर आलेली स्थिती असो की विरोधकांकडून झालेली विखारी टीका यावरही फडणवीस यांनी दिलखुलास उत्तरे दिली. उपमुख्यमंत्री होण्यासाठी पक्षाचा आदेश होता, मी तो आनंदाने स्वीकारला. त्यामुळे मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठा मानसन्मान मिळाल्याचे फडणवीस म्हणाले. यापुढेही पक्षाने आदेश दिला तर तो एकही प्रश्न उपस्थित न करता स्वीकारेल. घरी बसा म्हटले तर राजकारणही सोडेल, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांचा ताफा जातो तेव्हा वाहतूक रोखली जाते, यामुळे मला मोठे दडपण येते. यावरून पोलिसांशी वादही होतो, असे फडणवीस म्हणाले