Charity directors under search : पुण्यातील घटनेनंतर भंडाऱ्यात आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा
Bhandara पुण्यातील दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयात Deenanath Mangeshkar Hospital (DMH) गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर राज्यभरात आरोग्य व्यवस्था आणि धर्मादाय रुग्णालयांवरील निगराणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग देखील सतर्क झाले आहे. बुधवारी तातडीने बैठक घेऊन जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांची सेवा, सवलती व उपचार सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला.
या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम, धर्मादाय आयुक्त नीलिमा मालोदे यांच्यासह जिल्ह्यातील धर्मादाय संस्थांचे प्रतिनिधी, डॉ. भगवान म्हस्के आणि मनीष बलवानी उपस्थित होते. या बैठकीत रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, सवलती, तसेच आपत्कालीन सेवा यावर विशेष चर्चा झाली.
भंडाऱ्यात फक्त दोनच धर्मादाय रुग्णालये आहे. एक म्हणजे संत गुलाबबाबा योग प्राकृतिपचार केले जातात. दुसरे म्हणजे सुंदरानी चॅरिटेबल नेत्र चिकित्सालय. डोळ्यांवरील उपचारासाठी प्रसिद्ध असलेले हे धर्मादाय रुग्णालय आहे.
Bhandara Education Department : शुल्क भरले नाही म्हणून 36 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखले!
मात्र, या दोन्ही रुग्णालयांत मल्टिस्पेशालिटी सेवा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात धर्मादाय सेवा मर्यादित स्वक चिकित्सालय व अनुसंधान केंद्र. तकीया वॉर्डात स्थित असलेले हे रुग्णालय नॅचरोपॅथीवर आधारित आहे. येथे पंचकर्म व नैसर्गिक उरूपात मिळत आहे. परिणामी, नागरिकांना गंभीर आजारांकरिता खासगी रुग्णालयांकडे वळावे लागते. धर्मादाय रुग्णालयांना राज्य शासनाच्या नियमांनुसार काही सेवा अत्यल्प दरात देणे बंधनकारक आहे. वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत असलेल्या रुग्णांसाठी १०% खाटा राखीव असणे आवश्यक आहे. अशा रुग्णांना ५०% सवलतीच्या दरात उपचार मिळायला हवेत.
पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर राज्यभर धर्मादाय रुग्णालयांमधील व्यवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष गेले आहे. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी भंडाऱ्यात आरोग्य विभागाने उचललेले पावले निश्चितच स्तुत्य असून, यामुळे धर्मादाय संस्थांवर देखरेख वाढण्यास मदत होईल.