Bahujan society will again be deprived of education : मराठी प्राध्यापक परिषदेतील सूर
Amravati महात्मा फुले यांनी यांनी शिक्षणाबाबत जो विचार मांडला, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी जो विचार रुजविला. ज्या बहुजन समाजाच्या घटकाचा त्यांनी विचार केला. तो बहुजन समाज पुन्हा शिक्षणापासून वंचित होण्याचा धोका नवीन शैक्षणिक धोरणामुळे निर्माण झाला आहे. असा सूर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी प्राध्यापक परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनात शनिवारी उमटला.
सरकारच्या शैक्षणिक व धोरणावर मंथन करण्यासाठी श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. डॉ. राजेंद्र हावरे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या अधिवेशनाचा उद्घाटन समारंभ श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत झाला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी परिषदेचे उद्घाटन केले.
Local body elections : अकोल्यासह ६ जिल्हा परिषदांमध्ये येणार प्रशासक राज ?
माजी अधिवेशनाध्यक्ष डॉ. अलका गायकवाड, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. रमेश अंधारे हे उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. पवन मांडवकर, सचिव प्रा. अतुलकुमार सारडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा या अधिवेशनात घडेल व शिक्षक म्हणून प्राध्यापकांच्या ज्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या आहेत. त्या या अधिवेशनाच्या निमित्ताने पूर्ण होतील, अशी अपेक्षा उद्घाटक प्र कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी व्यक्त केली, तर परिषदेचे अध्यक्ष डॉ. पवन मांडवकर यांनी मराठी प्राध्यापक परिषदेची भूमिका विशद केली, नव्या शैक्षणिक धोरणाबाबत जे चित्र दिसते, ते अत्यंत भेडसावणारे असून या धोरणाबाबत लोकशिक्षण करणे ही प्राध्यापक व जाणकार मंडळीची जबाबदारी आहे.
CM DEVENDRA FADNAVIS : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मेडिकलचे वसतिगृह पडद्यात लपविले !
महात्मा फुले यांनी यांनी शिक्षणाबाबत जो विचार मांडला, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी जो विचार रुजविला, ज्या बहुजन समाजाच्या घटकाचा त्यांनी विचार केला, तो बहुजन समाज पुन्हा शिक्षणापासून वंचित होण्याचा धोका या धोरणामुळे निर्माण झाला आहे, असे मत उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी व्यक्त केले आणि यासंदर्भात जनजागृती करावी, असे आवाहन केले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. मनोज तायडे यांच्या अध्यक्षतेत वत्क्त्यांनी ‘अभिजात मराठीः वास्तव आणि भवितव्य या विषयावर आपले विचार मांडले, तर डॉ. गजानन मुंद्रे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या तिसऱ्या सत्रात्य’ मराठी भाषा आणि साहित्य अभ्यासक्रम चर्चा’ या विषयावर वत्क्त्यांनी आपली मते मांडली. अधिवेशनाला मराठी विषयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुन्हा धोका आहेच
अध्ययन आणि अध्यापन ही प्रक्रिया अखंडित सुरू असते; परंतु नवीन शैक्षणिक धोरणामुळे केवळ अध्यापनाची प्रक्रिया पार पडणार असून अध्ययनाची नाही. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना आतापर्यंत भाषा हा जो आवश्यक विषय होता. तो आवश्यक म्हणून वगळला आहे. मराठीसह सर्वच भाषांसमोर संकट निर्माण झाले आहे. या शैक्षणिक धोरणामुळे पुन्हा वर्गारूपी शिक्षण पद्धती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला असून, श्रीमंत आणि गरिबांमध्ये फार मोठी विषमता निर्माण होणार आहे, असे मत अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हावरे यांनी व्यक्त केले.