Birth anniversary of Maasaheb Jijau Buldhana district : 12 जानेवारीला माँसाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव
Buldhana मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त 3 जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवास प्रारंभ झाला. मराठा सेवा संघाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे आगामी काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
या दशरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते होईल. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल आकाळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहेकरे, प्रकल्प प्रमुख पुरुषोत्तम कडू, राज्य सहसचिव डॉ. मनोहर तुपकर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम, जिजाऊ सृष्टीचे संचालक शिवाजीराजे जाधव, रविकांत काळवाघे, व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाषराव कोल्हे, वारकरी परिषदेच्या प्रदेश महासचिव ज्योती जाधव, सिंदखेड राजा तहसीलदार अजित दिवटे, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Congress BJP काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत मुख्यमंत्र्यांचा सत्कार !
या उद्घाटन कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव समितीच्यावतीने प्रा. मधुकर गव्हाड, सुखदेव बुरकुल, सागर खांडेभराड व सहकाऱ्यांनी केले आहे.
दरम्यान, 12 जानेवारी रोजी येथे माँसाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्त संपूर्ण राज्यासह देशभरातून नागरिक सिंदखेड राजा येथे येता. या जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात ही खऱ्या अर्थाने सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाने होत असते. त्यामुळे यास एक वेगळे महत्त्व आहे. ३ जानेवारीपासून १२ जानेवारीपर्यंत सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर सलगपणे विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या मशाल रॅलीचेही एक मोठे आकर्षण सिंदखेड राजा येथे असते.
मुख्यमंत्री येणार का?
या उत्सवाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांना निमंत्रण देण्यात आले आहे. अधिवेशन काळात लोकप्रतिनिधींनी भेटून त्यांना निमंत्रण दिले होते. त्याचवेळी सिंदखेडराजासाठी अतिरिक्त विकासनिधी देण्याची विनंती देखील केली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.