Breaking

Sonam Wangchuk : अनुभवातून मिळतं तेच खरं शिक्षण

 

The real education comes from experience : सोनम वांगचुक यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Wardha मी स्वतः शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना शिकवलं आहे. पुढे शिक्षणाचे काम करीत असताना बाहेर जे शिकतो, अनुभव घेतो ते खरे शिक्षण आहे, याचा साक्षात्कार झाला. निव्वळ डोक्याचा वापर आणि कौशल्य असलं म्हणजे शिक्षण नव्हे. यातून घातक गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे शिक्षण घेताना तुमच्या हृदयात करुणा आवश्यक आहे, असं शिक्षण व पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचूक म्हणाले.

सेवाग्राम आश्रमातील नई तालिम समिती परिसरातील शांती भवनात पालक-विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. आज विद्यार्थी शाळेत काय शिकतो हे बघण्याची गरज आहे. आईला तर अनेक कला अवगत असतात. पण ती शाळेत जाऊन शिकली नाही. घरातील कामे मुलांना शिकविली पाहिजे. आपण आज इतिहास आणि गांधीजींच्या शिक्षणाचा विचार सोडून पाश्चात्त्य देशांच्या मागे जात आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

 

Nitin Gadkari : वीरांच्या गौरवासाठी व्यासपीठावरून खाली उतरले नितीन गडकरी !

 

लेखन, वाचन व मनन यावर आजच्या शिक्षण प्रणालीचा भर दिला जातो. जे जीवनामध्ये निरर्थक ठरत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हेड, हॅण्ड्स आणि हार्ट या ‘थ्री-एच’चा समतोल साधून चांगले जीवन जगू शकतो असे सांगितले आहे. वास्तवात आपल्याला प्राचीन काळापासून हेच शिकविण्यात आले आहे, असंही ते म्हणाले. तसेच गांधीजींच्या शिक्षण प्रणालीवर आधारित आनंद निकेतनमध्ये आल्याचा आनंद असल्याचंही ते म्हणाले.

Sudhir Mungantiwar : चंद्रपुरातून सुरू होणारी ‘क्लायमॅट चेंज’ चळवळ देशव्यापी व्हावी !

विद्यार्थी व पालकांनी देखील प्रश्नांची उत्तरेही सोनम वांगचुक यांनी दिली. माझ्यावर गांधीजींचा प्रभाव राहिला आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी नई तालिम समितीचे मंत्री डॉ. प्रभाकर पुसदकर, आनंद निकेतनच्या संचालिका सुषमा शर्मा, मुख्याध्यापिका जयमाला गावंडे, डॉ. सुहास जाजू, जयश्री कामडे, युगंधरा खोडे, महिला आश्रम अध्यापक विद्यालयातील विद्यार्थिनी, प्राध्यापिका, पालक, किशोर अमृतकर, विनय करुले, पंडित चन्नोळे, शंकर भोयर, आनंद निकेतन शाळेचे शिक्षक व नई तालिम समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.