Claim for electricity connection within 24 hours : सहा हजार ग्राहक प्रतीक्षेत; महिन्याला १ हजार अर्ज
Akola महावितरणकडून २४ तासांत नवीन वीज जोडणी देण्याचा दावा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यातील ६ हजार ग्राहक नवीन कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना वेळेत सेवा मिळत नसल्याची तक्रार आहे. दर महिन्याला १ हजाराहून अधिक ग्राहक नवीन जोडणीसाठी अर्ज करतात. मात्र, महिन्यांनंतरही त्यांना वीज कनेक्शन मिळत नाही. यामुळे महावितरणच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महावितरणकडून नादुरुस्त मीटर बदलणे, वीज चोरी रोखणे आणि स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. जानेवारी महिन्यात नियोजन भवनात झालेल्या बैठकीत महावितरणचे कार्यकारी संचालक (विशेष प्रकल्प) आणि परिमंडळ पालक धनंजय औंढेकर यांनी केंद्र शासनाच्या “इज ऑफ लिव्हिंग” अभियानांतर्गत २४ तासांत नवीन वीज जोडणी देण्याचे निर्देश दिले होते.
विशेषतः अकोला शहरात “मागेल त्याला २४ तासांत वीज जोडणी” आणि ग्रामीण भागातही लवकरात लवकर सेवा पुरवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मुदतीनंतर जोडणी दिल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना दंड आकारला जाणार असल्याचेही तेव्हा सांगण्यात आले. मात्र, सध्याच्या परिस्थितीवरून हे आदेशच केराच्या टोपलीत टाकल्याचे स्पष्ट होते.
अकोला ग्रामीणमध्ये ३१६४, अकोला शहर १४५९, अकोट विभागात २०७२, अकोला सर्कलमध्ये ६६९५ अशा सह्याद्री विभागातील प्रलंबित वीज जोडण्या आहेत. महावितरणकडून दोन प्रकारच्या जोडण्या करण्यात येतात. एक म्हणजे इन्फ्रा (INFRA) होय. अशाठिकाणी नवीन पोल आणि इतर यंत्रणा उभारण्याची गरज असते. दुसरे म्हणजे नॉन-इन्फ्रा (NON-INFRA) होय. येथे थेट कनेक्शन दिले जाते.
नियमांनुसार नॉन-इन्फ्रा जोडणी ७ दिवसांत आणि इन्फ्रा जोडणी ३ महिन्यांत द्यायची आहे. मात्र, महावितरण अधिकारी २४ तासांत कनेक्शन देण्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात अनेक ग्राहक महिन्यांपासून प्रतीक्षेत आहेत.
Gang rape of a minor girl : परीक्षाकेंद्रावर नव्हे थेट कारागृहात पोहोचला
महिनाभरापूर्वी नवीन मीटर जोडणीचे काम एका खाजगी कंपनीला आउटसोर्स करण्यात आले. मात्र, या कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने नवीन कनेक्शनची कामे रखडली आहेत. याचा फटका ग्राहकांना बसत असून, नाहक त्रास सहन करावा लागत आहे.