Chief Secretary takes notice of increasing accidents in Nagpur : बैठक घेऊन दिल्या उपाययोजना करण्याच्या सूचना
Nagpur उपराजधानीतील वाढत्या अपघातांची राज्यात चर्चा होत आहे. येथील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी याची गंभीर दखल घेत नागपूर विभागाची आढावा बैठकच घेतली. रस्ते अपघात टाळण्यासोबतच शुन्य अपघात मृत्युदर साध्य करण्यासाठी येत्या तीन वर्षाचा जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करावा. तसेच प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विविध यंत्रणांना दिल्या आहेत.
या बैठकीला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त आंचल गोयल, पोलीस उपायुक्त वाहतूक अर्चित चांडक प्रामुख्याने उपस्थित होते.
रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी व परिणामकारक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी सकाळी ६ ते १० व रात्री ६ ते ९ या वेळात होणारे अपघात टाळावे लागतील. त्याकरिता राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी मार्गदर्शक फलक, अपघात प्रवण स्थळाच्या ठिकाणी रस्ते विभाजक, साईनबोर्ड तात्काळ लावावेत अशा सूचना सौनिक यांनी केल्या.
Gondia police : शिवमहापुराण कथा समारोप कार्यक्रमात खुनाचा प्रयत्न!
अपघातानंतर गोल्डन अव्हरमध्ये वैद्यकीय सुविधा तसेच औषोधोपचारासाठी शासकीय रूग्णालयासोबतच खाजगी रूग्णालयातुनही उपचार उपलब्ध होईल यादृष्टीने अशा रूग्णालयांची नोंदणी करण्याला प्राधान्य देण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील गर्दीच्या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील तसेच फुटपाथ वरील अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे. अंधार असलेल्या रस्त्यांवर विद्युत व्यवस्था करावी, असे निर्देशदेखील त्यांनी यंत्रणेला दिले.