Shiv Bhojan Centers’ troubles are increasing: Services continue in the district from 24 centers : वाढतोय शिवभोजन केंद्रांचा त्रास : २४ केंद्रांवरून जिल्ह्यात सेवा सुरूच
Gondia : शासनाकडून गरिबांसाठी शिवभोजन योजना राबविली जात आहे. त्यानुसार दुपारी १२ ते ३ या वेळेत येणाऱ्या गरिबांना मध्यान्ह भोजनाचे वाटप केले जाते. त्यामुळे पोटासाठी भ्रांत असलेल्यांना अन्नाचा लाभ मिळतो आहे. दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून अनुदान न मिळाल्यामुळे दररोज २०५० जणांचे पोट कसे भरणार, असा सवाल केला जात आहे.
महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन ही योजना राबवायला सुरुवात केली. त्यामुळे गरीब नागरिकांना दुपारच्या जेवणाची सोय झाली. लॉकडाउन काळात तर या योजनेने अनेकांना आधार दिला आहे. गोंदिया जिल्ह्यात २४ शिवभोजन केंद्र आहेत. पहिल्या येणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य या तत्त्वानुसार दुपारी १२ ते ३ या वेळेत शिवभोजन दिले जाते.
Pravin Darekar : संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी राज्याच्या अस्मितेचा ठेका घेतलेला नाही
वरण, भात, भाजी आणि दोन चपात्या अशी ही शिवभोजन थाळी आहे. कोरोनाच्या कठीण काळात कुणीही उपाशीपोटी राहू नये, यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली. यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभोजन केंद्र आताही सुरूच आहेत. परंतु शासन प्रत्येक महिन्याला या केंद्रांना अनुदान देत नाही. १५ सप्टेंबरपासूनचे अनुदान आताही न मिळाल्याने या भुकेलेल्यांना भोजन कसे चारावे, असा सवाल या केंद्रांना पडला आहे.
चार महिन्यांत २ लाख ४६ हजार जणांचे भरले पोट
गोंदिया जिल्ह्यात २४ केंद्रांच्या माध्यमातून गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गरजूंना खरेच मोठा आधार झाला व त्यांच्या २ वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. १५ सप्टेंबर ते १५ जानेवारी या चार महिन्यात २ लाख ४६ हजार भुकेल्यांचे पोट या शिवभोजन केंद्र चालकांनी भरले आहे.
Gondia Zilla Parishad : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रथमच बिनविरोध !
चार महिन्यापासून अनुदान नाही
१५ सप्टेंबर पर्यंतचे अनुदान गोंदियातील शिवभोजन केंद्र चालकांना दिला होते. आता चार महिन्याचे सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या चार महिन्याचे अनुदान मिळाले नाही.
थाळीमागे मिळते ४० रुपये अनुदान
एका थाळीमागे शासन ४० रुपये अनुदान देते. १० रुपये लाभार्थ्याकडून घेतले जातात. प्रत्येक थाळीमागे ४० रुपये अनुदान मिळते. या अनुदानातून शिवभोजन केंद्र चालविले जातात. शिवभोजन केंद्रावरून वरण, भात, भाजी आणि दोन चपात्या या पदार्थांचा समावेश आहे. १० रुपये मोजून लोकांना हे भोजन मिळते.
केंद्र चालक म्हणतात
आमच्या खिशातून पैसे खर्च करून शिवभोजन लाभार्थ्यांना दिले. १५ सप्टेंबरपासून या योजनेचे पैसे आले नाहीत. शिवभोजन चालविण्यासाठी आम्हाला खिशातून पैसे लावावे लागत आहेत, असे शिवभोजन केंद्र चालक माया शिवणकर यांनी सांगितले.
२४ जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्रे
-२०५० रोजच्या थाळी लाभार्थ्यांची संख्या
– शहरातील एकूण शिवभोजन थाळी केंद्र-२
– शहरातील रोज थाळी लाभार्थ्यांची संख्या ४००
– ग्रामीण भागात दिवसाकाठी थाळींची परवानगी ७५