Vijay Vadettiwar said the families of those killed in the tigress attack should be taken into the forest department : तात्काळ मोबदला देण्याचे विजय वडेट्टीवार यांनी दिले निर्देश
Nagpur : तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांवर वाघाणीने हल्ला केला. यामध्ये तिनही महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल (१० मे) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सिंदेवाही वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या उपवनभेत्र डोंगरगाव मधील चारगाव कक्ष क्रमांक २५२ येथे घडली. या परिसरात दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
मृतांमध्ये कांता बुधाजी चौधरी, शुभांगी मनोज चौधरी आणि रेखा शालिक शेंडे या तिघींचा समावेश आहे. तिघीही सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल येथील रहिवासी आहेत. या दुर्दैवी घटनेमुनंतर काल मेंढामाल गावात चुलही पेटली नाही. वडेट्टीवार अंतसंस्काराला उपस्थित होते. यानंतर त्यांनी वनविभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, पोलिस निरीक्षक राठोड यांना तात्काळ हल्लेखोर वाघीणीचा बंदोबस्त करण्याच्या सुचना दिल्या.
मृतांच्या कुटुंबांतील एका व्यक्तीला वनविभागाच्या सेवेत रुजू करून घ्या आणि वनविभागाकडून कुटुंबीयांना दिला जाणारा मोबदला तात्काळ द्या, असे निर्देश वडेट्टीवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नये, यासाठी विशेष उपाययोजना कराव्या, असेही त्यांनी यावेळी वन अधिकाऱ्यांना सांगितले.
Operation Sindoor : भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारच्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा !
वनअधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीला सिंदेवाही काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, सिंदेवाहीचे नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, मेंढामाल काँग्रेस कमिटीचे शाखाध्यक्ष वामनराव कोकोडे, गुरुदास बोरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजित मुप्पीडवार, नथ्थुजी सोनुले उपस्थित होते.