Breaking

Water Shortage : लोकसंख्या सात लाख, पाणीपुरवठा १० दिवसांआड!

Water supply to seven lakh population for once in 10 days : जलसाठ्यात सातत्याने होतेय घट; पाणी टंचाईचे सावट कायम

Buldhana गेल्या ११ वर्षांत बुलढाणा जिल्ह्यातील नागरी लोकसंख्या सुमारे ५.५६ लाखांवरून ७ लाखांवर गेली आहे. तरी पाणीटंचाईचे संकट अद्यापही सुटलेले नाही. जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील बाष्पीभवन, गळती आणि कथित पाणीचोरी यांसारख्या कारणांमुळे अवघ्या एका आठवड्यात २५ दलघमीने जलसाठ्यात घट झाली असून, सध्या केवळ २२.९० टक्के (१०७.१८ दलघमी) पाणी शिल्लक आहे.

‘जलजीवन मिशन’ आणि ‘हर घर नळ’ यांसारख्या योजनांची घोषणा मोठ्या गाजावाजात करण्यात आली होती. २०२४ अखेर या योजना पूर्ण होतील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, २०२५ चे सहा महिने उलटूनही अपेक्षित कामगिरी झालेली नाही. परिणामी, जिल्ह्यातील बहुतांश नागरी भागात दररोज पाणीपुरवठा केवळ एक स्वप्न ठरत आहे.

Adv. Prakash Ambedkar : युद्धबंदीची माहिती प्रथम अमेरिकेकडूनच का?

अनेक ठिकाणी उपलब्ध पाणीही नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाईचे स्वरूपही उघड होत आहे. केवळ शेगाव आणि जळगाव जामोद हे दोन शहर वगळता उर्वरित सर्वच ठिकाणी उन्हाळ्यातील टंचाई कायम आहे.

Separate Vidarbha State : पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाचा नारा, यात्रा निघणार!

शहरनिहाय पाणीपुरवठा स्थिती (मे २०२५)

शहर प्रकल्प पुरवठा कालावधी लोकसंख्या
बुलढाणा-येळगाव ८ दिवसांआड ८०,०००
चिखली-पेनटाकळी ८ दिवसांआड —
देऊळगाव राजा-खडकपूर्णा ११ दिवसांआड ३५,०००
सिंदखेड राजा-खडकपूर्णा ९ दिवसांआड २३,०००
मेहकर-कोराडी ८ दिवसांआड ५०,०००
लोणार-बोरखेडी-दे. कुंडपाळ १ महिन्याआड २५,०००
खामगाव-ज्ञानगंगा ११ दिवसांआड १,१०,०००
नांदुरा-ज्ञानगंगा-जिगाव ४ दिवसांआड ४७,०००