Tiranga Rally to salute the army : बुलढाण्यात तिरंगा रॅलीतून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम
Buldhana पुलवामा (किंवा पहलगाम) येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर देशभरात देशभक्तीचे वातावरण आहे. भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी बुलढाणा शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रॅलीदरम्यान “भारत माता की जय”, “वंदे मातरम” तसेच “सून ले पाकिस्तान, बाप तुम्हारा हिंदुस्तान” अशा घोषणांनी शहराचा परिसर दणाणून गेला. शहरातील मातोश्री जनसंपर्क कार्यालयासमोरून रॅलीला सुरुवात झाली. जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक, चिखली रोड, सर्क्यूलर रोड, संगम चौक या मार्गावरून रॅली निघाली. शेकडो दुचाकीस्वार तरुण यात सहभागी झाले होते.
“सीमेवर भारतीय सैनिक आपले प्राण पणाला लावून देशाचं रक्षण करत आहेत. रजेवर असलेले जवानही परत सीमेवर जात आहेत. त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि त्यांच्यासोबत आपली एकजूट दाखवण्यासाठी ही तिरंगा रॅली आयोजित केली आहे.”
Adv. Prakash Ambedkar : युद्धबंदीची माहिती प्रथम अमेरिकेकडूनच का?
शनिवारी रात्री युद्धविराम झाल्याची माहिती समजली होती. त्यामुळे ही रॅली छत्रपती संभाजी महाराज जयंतीपूर्व उपक्रम म्हणून आयोजित करण्याचा विचार होता. मात्र, पुन्हा पाकिस्तानकडून कुरबुरी सुरू झाल्याने नागरिकांत संताप उसळला आहे. “पाकड्यांना आपल्या जवानांनी त्यांची औकात दाखवल्याशिवाय शांत राहणार नाही,” असा इशारा आ. गायकवाड यांनी दिला.